३९ गावे; ३ शहरांवर ‘वॉच’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

३९ गावे; ३ शहरांवर ‘वॉच’
३९ गावे; ३ शहरांवर ‘वॉच’

३९ गावे; ३ शहरांवर ‘वॉच’

sakal_logo
By

84664
----------
३९ गावे; ३ शहरांवर ‘वॉच’
शिरोळ तालुक्यात महापुराची तयारी; सर्वच पातळ्यांवर यंत्रणा सज्ज

गणेश शिंदे : सकाळ वृत्तसेवा
जयसिंगपूर, ता. ११ : सध्या सुरू असणाऱ्या पावसामुळे तूर्त महापुराचा धोका नसला तरी प्रशासन महापुराशी दोन हात करण्यासाठी सज्ज आहे. शिरोळ तालुक्यातील ३९ गावे आणि तीन शहरांमधील संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पूर नियंत्रणासाठी नियोजन केले आहे.
जिल्ह्यात शिरोळ तालुक्याला महापुराचा मोठ्या प्रमाणावर फटका बसतो. त्यामुळे प्रशासनाने गतवेळचे अनुभव लक्षात घेत यंत्रणा कार्यान्वित केली आहे. तालुक्यातील ३९ गावे आणि ३ शहरातील पूरपट्ट्यातील पूरग्रस्त कुटुंबांना प्रशासनाकडून सूचना दिल्या आहेत. सुमारे ३७ हजार कुटुंबांना प्रशासनाने आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. महापुराचा सर्वाधिक फटका बसणाऱ्या शिरोळ तालुक्यातील जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी प्रशासनाकडून तयारी केली जात आहे. प्रशासनाकडून प्रभावी उपाययोजना राबवण्यात येत आहेत. तालुक्यातील पूरबाधित ४४ गावे आणि शहरांना ग्रामपंचायती आणि नगरपालिकेमार्फत आवाहन केले आहे.
जीवनदायिनी ठरणाऱ्या तालुक्यातील चार नद्या पावसाळ्यात मात्र धडकी भरवणाऱ्या ठरत आहेत. नदीकाठच्या गावांना महापुराचा तडाखा बसतो. २००५ आणि २०१९ च्या महापुरात तालुक्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासन पाटबंधारे विभागाशी संपर्कात आहे. आज महापुराचा धोका नसला तरी पावसाच्या प्रमाणावर धोक्याचे स्वरूप अवलंबून आहे. त्यामुळे पूरबाधित गावांना वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करून सहकार्याचे आवाहन केले आहे.
....

सध्या तरी महापुराचा तालुक्याला धोका नाही मात्र पावसाचे प्रमाण वाढल्यास काही प्रमाणात फटका बसू शकतो त्यादृष्टीने प्रशासनाने नियोजन केले आहे. बाधित गावातील पाईपलाईन दुरुस्तीची कामे करण्याचे आदेश दिले आहेत. बेटांचे स्वरूप प्राप्त होणाऱ्या गावांसाठी पुरेसा औषध साठा केला जाणार आहे. तालुक्यातील पूरबाधित गावांमधील नागरिकांनी प्रशासनाच्या सूचना लक्षात घेऊन सहकार्य करण्याची गरज आहे.

- शंकर कवितके, गटविकास अधिकारी, पंचायत समिती शिरोळ

Web Title: Todays Latest Marathi News Jsp22b02880 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..