यशवंत विद्यालयात प्लास्टीक विरोधी पोस्टर प्रदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यशवंत विद्यालयात प्लास्टीक विरोधी पोस्टर प्रदर्शन
यशवंत विद्यालयात प्लास्टीक विरोधी पोस्टर प्रदर्शन

यशवंत विद्यालयात प्लास्टीक विरोधी पोस्टर प्रदर्शन

sakal_logo
By

03520
-----------

यशवंत विद्यालयात प्लास्टिक विरोधी पोस्टर प्रदर्शन
जयसिंगपूर, ता. १४ : शालेय जीवनातील पर्यावरण संवर्धनाचे धडे महत्त्वपूर्ण ठरतात. यामुळे पर्यावरणाचे दीर्घकाळ संरक्षण होण्यास मदत होते. यशवंत विद्यालयाने प्लास्टिक विरोधी पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन करून सामाजिक चळवळीत योगदान दिले आहे. लहान वयातच पर्यावरणाबद्दल प्रेम निर्माण झाल्यास ते जीवनभर पर्यावरणप्रश्नी जागरूक राहतील, असे गौरवोद्‍गार जयसिंगपूर नगरपालिकेचे प्रशासक आणि मुख्याधिकारी तैमुर मुल्लाणी यांनी काढले.
यशवंत विद्यालयात प्लास्टिक विरोधी चळवळीला पाठबळ देण्यासाठी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पोस्टर प्रदर्शनाचे उद्‍घाटन गुरुवारी (ता. १४) फित कापून श्री मुल्लाणी यांच्या हस्ते केले. अन्य शाळांनीही प्लास्टिकविरोधी चळवळीला पाठबळ द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. कापडी पिशवी मौल्यवान- बनवी पर्यावरणाला धनवान, वसुंधरा वाचवा-जीवन आनंदी बनवा, मुक्या प्राण्यांचा विचार करा-प्लास्टिकचा वापर थांबवा, प्रदूषण पर्यावरणाच्या उत्क्रांतीस हानिकारक आहे, धरणी हमारी माता है प्लास्टिक से इसे बचाना है, असे विविध घोषवाक्य असणारे पोस्टर्स प्रदर्शनात मांडले.
मुख्याध्यापिका सौ. शारदा चोपडे यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. नगरपालिकेचे सभा कामकाज विभाग प्रमुख प्रमोद जाधव, आरोग्य विभागाचे प्रसाद भोसले, सहायक शिक्षक बी. बी. येलपले, शिक्षिका गायत्री कुंभार, बालवाडीच्या अध्यापिका अनिता सुतार आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Jsp22b02894 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..