जयसिंगपूरमध्ये रोटरीतर्फे पदग्रहण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जयसिंगपूरमध्ये रोटरीतर्फे पदग्रहण
जयसिंगपूरमध्ये रोटरीतर्फे पदग्रहण

जयसिंगपूरमध्ये रोटरीतर्फे पदग्रहण

sakal_logo
By

03579
----------------
जयसिंगपूरमध्ये रोटरीतर्फे पदग्रहण
जयसिंगपूर, ता. २५ : येथील रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटी व रोटरॅक्ट क्लब ऑफ ग्रीन सिटीचा पद्ग्रहण कार्यक्रम झाला. रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटीचे अध्यक्ष म्हणून उद्योगपती राजेंद्र मालू व सेक्रेटरी म्हणून जयदीप शेट्टी तर खजिनदार म्हणून हर्ष फडणीस यांनी निर्वाचित डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नासिर बोरसदवाला यांच्याहस्ते पदभार स्वीकारला. रोटरॅक्ट क्लब ऑफ ग्रीन सिटीचे अध्यक्ष म्हणून इंद्रजित कदम, सेक्रेटरी म्हणून अतुल गणबावले व खजिनदार म्हणून खुशाल बजाज यांनी ऋषिकेश जाधव यांच्याहस्ते पदभार स्वीकारला.
ॲड. किशोर लुल्ला, असिस्टंट गव्हर्नर रुस्तुम मुजावर, नूतन असिस्टंट गव्हर्नर अन्सार चौगुले, अनिकेत जाधव, विकेश बीचकर उपस्थित होते. स्वागत दादासो चौगुले यांनी केले. सेक्रेटरी अविनाश पट्टनकुडे यांनी मागील वर्षीच्या कार्याचा आढावा घेतला. नूतन अध्यक्ष राजेंद्र मालू यांनी या वर्षात महिला व मुलींसाठी तसेच तरुण मुलांसाठी विविध विषयांवर तज्ञ वक्त्यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान तसेच नवीन उद्योग व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुणांना व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला. ॲड. किशोर लुल्ला यांनी लुल्ला फाऊंडेशनमार्फत व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळेस व इतर उपक्रमास आवश्यक ते सहकार्य करणार असल्याचे सांगितले. बोरसदवाला यांनी ग्रीन सिटीकडून राबवण्यात येत असलेल्या नांदणी येथील सांडपाणी शुध्दीकरण प्रकल्पामुळे नदीतील पाण्याचे होणारे प्रदूषण थांबण्यास मदत होणार असल्याचे सांगून ग्रीन सिटीकडून भविष्यात राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमास आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. आभार श्रीराम बोंडगे यांनी मानले. पदग्रहण समारंभास रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटी व रोटरॅक्ट क्लब ऑफ ग्रीन सिटीचे अनेक सदस्य सह परिवार उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Jsp22b02932 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..