
शिरोळला चौदा केंद्रावर परीक्षा
शिरोळला चौदा केंद्रावर परीक्षा
जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील २७४७ विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्तीची परीक्षा दिली. रविवारी (ता.३१) तालुक्यातील पाचवी पूर्वसाठी नऊ तर आठवी पूर्वसाठी पाच केंद्रावर परीक्षा झाली. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी शिरोळ तालुक्यातील २८४८ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते. तालुक्यात रविवारी एकाच दिवशी चौदा केंद्रांवर ही परीक्षा झाली. पाचवीसाठी १९८९ विद्यार्थ्यांपैकी १९१७ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. ७२ विद्यार्थी अनुपस्थित राहिले. आठवीसाठी ८५९ विद्यार्थ्यांपैकी ८३० विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यामध्ये २९ विद्यार्थी अनुपस्थित राहिले. सर्वच केंद्रावर परीक्षा शांततेत झाल्याची माहिती, शिरोळ पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी दीपक कामत यांनी दिली.
Web Title: Todays Latest Marathi News Jsp22b02954 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..