घोडावत पॉलिटेक्निकला एनबीए मानांकन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घोडावत पॉलिटेक्निकला एनबीए मानांकन
घोडावत पॉलिटेक्निकला एनबीए मानांकन

घोडावत पॉलिटेक्निकला एनबीए मानांकन

sakal_logo
By

घोडावत पॉलिटेक्निकला एनबीए मानांकन
जयसिंगपूर, ता.१०: अतिग्रे (ता. हातकणंगले) येथील संजय घोडावत पॉलीटेक्निकच्या कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग, इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग आणि मेकॅनिकल इंजिनिअरींग या शाखांना एनबीए मानांकन प्राप्त झाले. हे मानांकन तीन वर्षासाठी मिळाले आहे.
एनबीए समितीने शैक्षणिक कामकाज, भौतिक सुविधा व कागदपत्रांची काटेकोरपणे तपासणी करून मानांकन दिले आहे. समितीने प्रामुख्याने टिचिंग लर्निंग प्रोसेस, रिसर्च अँड कन्सल्टन्सी, इन्फ्रास्ट्रक्चर अँड लर्निंग रिसोर्सेस, स्टुडंट्स फीडबॅक, आऊट कम बेस्ड एज्युकेशन, सीओ- पीओ मॅपिंग, प्लेसमेंट, कॉमन फॅसिलिटी अशा विविध गोष्टींचे निकष तपासले. यापूर्वीही संजय घोडावत पॉलीटेक्निकला दोन वेळेस एनबीए मानांकन मिळाले आहे. पॉलीटेक्नीकला महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्याकडून ‘इलेक्ट्रिकल मशीन’ लॅबला महाराष्ट्र राज्यातील प्रथम क्रमांकाची लॅब म्हणून पुरस्कार प्राप्त झाला होता. याचबरोबर टुडे रिसर्च अँड रेटिंग्स, नवी दिल्ली  या संस्थेमार्फत ‘बेस्ट अपकमिंग पॉलीटेक्निक इन महाराष्ट्र’ पुरस्काराने सन्मानित केले आहे. याचबरोबर महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्याकडून सर्व शाखांना ‘उत्कृष्ट दर्जा’ ही मिळाला आहे.
तसेच नॉलेज रिव्ह्यू मासिकाकडून ‘भारतातील टॉप टेन पॉलीटेक्निकमधील एक पॉलीटेक्निक’ म्हणून गौरवले आहे.
पॉलीटेक्नीकचे प्राचार्य विराट गिरी, विश्वस्त विनायक भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. मूल्यांकनासाठी संस्थेचे एनबीए समन्वयक  प्रा. नरेश कांबळे आदींचे सहकार्य लाभले.

Web Title: Todays Latest Marathi News Jsp22b02987 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..