गाथा स्वातंत्र्याची आज कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गाथा स्वातंत्र्याची आज कार्यक्रम
गाथा स्वातंत्र्याची आज कार्यक्रम

गाथा स्वातंत्र्याची आज कार्यक्रम

sakal_logo
By

‘गाथा स्वातंत्र्याची’ आज कार्यक्रम
जयसिंगपूर : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शिरोळ तहसील कार्यालयातर्फे ‘गाथा स्वातंत्र्याची...’ हा देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. बुधवारी (ता. १७) सायंकाळी साडेपाच वाजता सहकारमहर्षी शामराव पाटील-यड्रावकर नाट्यगृहात हा कार्यक्रम होईल. अविनाश सूर्यवंशी कार्यक्रमाचे निर्माते असून इचलकरंजीचे गायक मुकुंद चौगुले प्रस्तुतकर्ते आहेत. गायक मुकुंद चौगुले व गायिका सौ. नीता ठाकूर-देसाई हे स्वरसाज चढवणार आहेत. ऱ्हिदम ऋतिक कुरणे, विश्वनाथ चौगुले, सचिन देसाई, सर्जेराव कांबळे, हार्मनी संग्राम कांबळे, व्हायोलियन केदार गुळवणी यांची साथसंगत असणार आहे. निवेदक साहिल शेख हे आहेत. ध्वनिव्यवस्था प्रशांत होगाडे व ऋषिकेश ठाकूर-देसाई यांची आहे. प्रकाश योजना अमित ठाकूर-देसाई यांची आहे. कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Jsp22b03004 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..