जयसिंगपूर परिसरात विविध कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जयसिंगपूर परिसरात विविध कार्यक्रम
जयसिंगपूर परिसरात विविध कार्यक्रम

जयसिंगपूर परिसरात विविध कार्यक्रम

sakal_logo
By

जयसिंगपूर परिसर
जयसिंगपूर : शहरात भारताच्या स्वतंत्र्याचा अमृतमहोत्सव उत्साहात साजरा केला. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
नगरपालिकेत मुख्याधिकारी तैमूर मुल्लाणी यांच्या हस्ते ध्वजवंदन केले. पालिका कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. येथील जिल्हा सत्र व प्रथम वर्ग न्यायालयात ध्वजवंदन केले. त्याचबरोबर तिरंगा रॅली काढली. जिल्हा न्यायाधीश गिरीश गुरव, वरिष्ठ न्यायाधीश गायकवाड, प्रथमवर्ग न्यायाधीश करभाजन, प्रथमवर्ग न्यायाधीश रोहिणी जाधव आदी उपस्थित होते.
येथील आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर सोशल फाउंडेशनतर्फे विविध ठिकाणी ध्वजवंदन केले. दरम्यान, अनाथ आश्रम शाळेमधील विद्यार्थ्यांना जिलेबी, केळी व बिस्किट वाटप केले. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, गुंडाप्पा पवार आदी उपस्थित होते. येथील मालू हायस्कूलमध्ये वीरपत्नी सुलाताई पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन केले. राजेंद्र मालू, एस. एच. भोसले, एस. व्ही. हजारे, मुख्याध्यापक आर. आय. पोवार, प्रसन्न कुंभोजकर आदी उपस्थित होते. जनतारा शिक्षण संकुलामध्ये प्रवीण इंगळे व नितीन पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन केले. मुख्याध्यापक दीपक वाडकर, चेअरमन महावीर पाटील, राजेंद्र नांद्रेकर, धनपाल देमापुरे उपस्थित होते. येथील छत्रपती शाहू चौक, शाहूनगर येथे कमल दिलीप ओझा यांच्या हस्ते ध्वजवंदन केले. शैलेश आडके, डॉ. प्रसाद माने, माजी नगरसेविका आसावरी आडके, शंकर नाळे आदी उपस्थित होते. येथील राष्ट्रीय विचारधारा लोकसेवा फाउंडेशन व जयप्रकाश खादी ग्रामोद्योग भांडार जयसिंगपूर येथे लंगरे यांच्या हस्ते ध्वजवंदन केले. डॉ. चिदानंद आवळेकर, उपाध्यक्ष माधुरी चौगुले, प्रमिला कामत आदी उपस्थित होते. जयसिंगपूर ख्रिस्ती मंडळातर्फे १३ ते १५ ऑगस्टदरम्यान ध्वजवंदन केले. पोलिस उपनिरीक्षक स्नेहल टकले, डॉ. एम. के. लोखंडे, प्रीती ढाले, साकीन आठवले उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Jsp22b03005 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..