मगदूम अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मगदूम अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची निवड
मगदूम अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची निवड

मगदूम अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची निवड

sakal_logo
By

मगदूम अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची निवड
जयसिंगपूर, ता. १९ : येथील डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या सिव्हिल विभागातील ३० विद्यार्थ्यांची सरकारी नोकरीत विविध पदांवर निवड झाली. त्यापैकी सहा विद्यार्थी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेत अ श्रेणी मिळवत उत्तीर्ण होऊन व इतर २४ विद्यार्थी सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा, नगररचना, जिल्हा परिषद इत्यादी ठिकाणी विविध शासकीय पदांवर रुजू झाल्याची माहिती कॅम्पस डायरेक्टर डॉ. सुनील आडमुठे व प्र. प्राचार्या डॉ. शुभांगी पाटील यांनी दिली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये यश संपादन करून निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये दादासाहेब गडदे, योगेश मोरे, अक्षया बेडककर, रोहित कोळी, सौरभ पाटील, वसीम जमादार यांचा समावेश आहे. दीपा मुलिया, सतीश सरगर, श्रीकांत मोठे, अनुजा पाटील, सूरज वाघमारे, अभिजित सातपुते, अतुल वाघमारे, शब्बीर फकीर, पूनम वर्मा, अझीम जमादार, नितीन पाटील, सचिन पोळ, धनंजय निर्मळे, सोनाली खडतरे, अमित साळे, स्मिता पाटील, प्रशांत चव्हाण, महेश चौगुले, योगिता पाटील, दत्तात्रय पाटील, गणेश कोरे, अविनाश मस्के, हरिश्चंद्र पाटील, उमेश परीट यांची निवड विविध विभागांत झाली आहे. चेअरमन डॉ. विजय मगदूम व व्हाईस चेअरपर्सन अ‍ॅड. डॉ. सोनाली मगदूम यांनी ही महाविद्यालयासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट असल्याचे नमूद करत अभिनंदन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Jsp22b03014 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..