चुकीच्या नोंदीमुळे महसुल बुडीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चुकीच्या नोंदीमुळे महसुल बुडीत
चुकीच्या नोंदीमुळे महसुल बुडीत

चुकीच्या नोंदीमुळे महसुल बुडीत

sakal_logo
By

चुकीच्या नोंदीमुळे महसुल बुडीत
सामाजिक कार्यकर्ते जीवन पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
जयसिंगपूर, ता. २१ : इ-गव्हर्नमेंट अंतर्गत सुविधा वाढवण्यासाठी ऑनलाईन ७/१२ चे पोर्टल सुरु झाले. घरबसल्या स्थावर मिळकतीची माहिती उपलब्ध झाली. वर्ग १ व २ या एका अंकाच्या चुकीच्या नोंदीमुळे शासनाचे मोठे महसुली नुकसान होवून शासनाचा महसुल बुडत असल्याची तक्रार जयसिंगपूरचे सामाजिक कार्यकर्ते जीवन पाटील यांनी जिल्हाधिकारी राहूल रेखावर यांच्याकडे केली आहे.
तक्रारीत म्हटले आहे, ‘सातबारा शक्यतो शेतजमिनीचा निघतो. जयसिंगपूर परिसरात बहुतेक जमिनी इनामी आहेत. हस्तलिखित सातबारावर धारणा प्रकार खा म्हणजेच इनाम खालसा असा होता. ऑनलाईन नोंद करताना वर्ग १ व २ असे दोनच पर्याय असल्याने बहुतांश नोंद वर्ग १ झाली आहे. खालसा जमिनी शेती कारण व्यतिरिक्त अन्य कारणासाठी विक्री करताना अनार्जित रक्कम महसूल भरून व्यवहार करण्याची अट आहे. मात्र ऑनलाईन नोंदी वर्ग १ झाल्याने जिल्हाधिकारी परवानगीशिवाय परस्पर होत आहेत. त्यामुळे शासनाचा मोठा महसूल बुडत आहे.’

Web Title: Todays Latest Marathi News Jsp22b03026 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..