भटक्या कुत्र्यांचे कळप आले कुठून? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भटक्या कुत्र्यांचे कळप आले कुठून?
भटक्या कुत्र्यांचे कळप आले कुठून?

भटक्या कुत्र्यांचे कळप आले कुठून?

sakal_logo
By

03750


भटक्या कुत्र्यांचे कळप आले कुठून?
जयसिंगपुरात दहशत; पालिकेकडून बंदोबस्ताची मागणी

जयसिंगपूर, ता. २४ : शहरातील गजबजलेल्या ठिकाणी भटक्या कुत्र्यांचे कळप दिसत आहेत. आठ दिवसांतच हे कळप दिसत असल्याने अचानक ते आलेच कुठून, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय वाहनधारकांचा पाठलाग या भटक्या कुत्र्यांकडून केला जात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पालिका प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. शहरात आठ ते दहा दिवसांपासून भटक्या कुत्र्यांचे कळप शहराच्या विविध मार्गांवर तसेच गजबजलेल्या ठिकाणी आढळून येत आहेत. अनेक ठिकाणी या कुत्र्यांकडून नागरिकांचा तसेच दुचाकीस्वारांचा पाठलाग केला जात आहे.
याआधीदेखील भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात लहान मुलांसह नागरिक जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी भटकी कुत्री थेट पालिकेत आणून सोडण्याचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाने भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी त्यांची धरपकडही केली; मात्र कालांतराने ही मोहीम थंडावली आणि पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांच्या भीतीच्या छायेत नागरिकांना वावरावे लागत आहे.
शहरात सर्वच ठिकाणी पंधरा-वीस कुत्र्यांचे कळप दिसत आहेत. अगदी हिंस्त्र असल्याप्रमाणे त्यांचा वावर सुरू आहे; मात्र ही कुत्री आली कुठून याचा शोध घेण्याची गरज आहे. सध्या नागरिक भटक्या कुत्र्यांच्या भीतीच्या छायेखाली असून पालिका प्रशासनाने तातडीने त्यांचा बंदोबस्त करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.
....

अपघातांच्या घटना
भटक्या कुत्र्यांचे कळप मार्गावरून जाणाऱ्या दुचाकीस्वारांचा पाठलाग करण्याच्या घटना घडत आहेत. कुत्र्यांच्या चाव्यापासून बचाव करण्यासाठी दुचाकीस्वार वेगाने गाडी पळवत असल्याने किरकोळ अपघाताच्या घटना घडल्या आहेत.
....

मॉर्निंग वॉकर्सनाही भीती
शहरात पहाटेपासून फिरायला घराबाहेर पडणाऱ्या महिला, पुरुषांची संख्या मोठी आहे. पहाटे मार्गावर वर्दळ नसल्याने भटक्या कुत्र्यांच्या कळपात सापडलो तरी काही खरे नाही, याची जाणीव असल्याने पहाटे लवकर बाहेर पडणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Jsp22b03039 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..