जयसिंगपूरसह तीन ठिकाणी छापे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जयसिंगपूरसह तीन ठिकाणी छापे
जयसिंगपूरसह तीन ठिकाणी छापे

जयसिंगपूरसह तीन ठिकाणी छापे

sakal_logo
By

जयसिंगपूर, अर्जुनवाडसह
तीन ठिकाणी छापे
जयसिंगपूर : या प्रकरणी प्राप्तिकर विभागाने अर्जुनवाड आणि संभाजीपूर (ता. शिरोळ) येथील निवासस्थानावर छापा टाकला. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची तपासणी सुरू होती. सांगलीतील जागेचीदेखील अधिकाऱ्यांनी पाहणी केली. या कारवाईने खळबळ उडाली आहे. सकाळी साडेसातनंतर पथक अर्जुनवाड येथे दाखल झाले. पथकाने घरातील सर्व कपाटे, विविध साहित्य, चार चाकी वाहने, गोठा यांसह विविध ठिकाणी असलेल्या कागदपत्रांची झाडाझडती घेतली. त्यानंतर दोन अधिकारी कागदपत्रांची पडताळणी करीत होते. अन्य अधिकारी चौकशी करीत होते. येथे पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. दुपारच्या सुमारास पथकाने आपला मोर्चा जयसिंगपूर, संभाजीपूर येथील असलेल्या आलिशान बंगल्याकडे वळविला. तेथेही झाडाझडती घेतली. त्यानंतर सांगलीतील प्लॉटचीही पाहणी केली. पथक दुपारी पुन्हा अर्जुनवाड येथे आले आणि पुन्हा कागदपत्रे एकत्रित करून चौकशी सुरू केली. रात्री उशिरापर्यंत प्राप्तिकराचे अधिकारी माहिती घेत आहेत. अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असताना त्यांनी आम्ही आताच काही माहिती देऊ शकत नसल्याचे सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Jsp22b03051 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..