ओडीएफ प्लस, प्लस मानांकनाची जयसिंगपूर पालिकेची हॅट्रिक ः मुल्लाणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओडीएफ प्लस, प्लस मानांकनाची जयसिंगपूर पालिकेची हॅट्रिक ः मुल्लाणी
ओडीएफ प्लस, प्लस मानांकनाची जयसिंगपूर पालिकेची हॅट्रिक ः मुल्लाणी

ओडीएफ प्लस, प्लस मानांकनाची जयसिंगपूर पालिकेची हॅट्रिक ः मुल्लाणी

sakal_logo
By

ओडीएफ प्लस, प्लस मानांकनाची
जयसिंगपूर पालिकेची हॅट्‌ट्रिक ः मुल्लाणी

जयसिंगपूर, ता. १ : येथील नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण २०२२ अंतर्गत ओडीएफ प्लस प्लस मानांकनाची हॅट्‌ट्रिक साधली आहे. ही बाब शहरातील प्रत्येक नागरिकांसाठी अभिमानाची असून येणाऱ्या काळातही शहराच्या स्वच्छतेसह विकासकामांसाठी प्रयत्नशील राहणार असल्याची माहिती, मुख्याधिकारी तैमूर मुल्लाणी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
ते म्हणाले, ‘‘केंद्र शासनाकडून नेमलेल्या समितीकडून शहराची पाहणी करून अहवाल केंद्र शासनास पाठवला होता. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शहर स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, शौचालय व्यवस्थापनमध्ये जयसिंगपूर नगरपालिकेने चांगले कार्य केल्याचे दिसून आल्यानंतर तसेच केंद्र शासनाकडून तिसऱ्यांदा पालिकेला ओडीएफ प्लस प्लस मानांकन दिले आहे. याबाबतचे प्रमाणपत्र पालिकेला प्राप्त झाले आहे.’ याकामी पाणीपुरवठा अभियंता जमीर मुश्रीफ, स्वच्छता निरीक्षक संदीप कांबळे, शहर समन्वयक प्रसाद भोसले आदींचे योगदान लाभल्याचेही त्यांनी सांगितले.’’

Web Title: Todays Latest Marathi News Jsp22b03077 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..