अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अटक
अटक

अटक

sakal_logo
By

३८३७

जयसिंगपुरात दोघांकडून
डंपरसह सहा दुचाकी जप्त
जयसिंगपूर : गुन्हे शोध पथकाने मोटारसायकली आणि डंपर चोरीतील दोघांना अटक केली. त्यांच्याकडून सहा मोटारसायकली आणि डंपर असा तीन लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ३ सप्टेंबरला मोटारसायकल चोरीचा गुन्हा जयसिंगपूर पोलिसात नोंद केला होता. त्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी गुन्हे शोध पथकाला तपास करण्याचे आदेश दिले होते. पथक शहरात पेट्रोलिंग करतताना खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार विनोद बाबू जाधव (वय २२), सुनील रामन्ना रामाप्पा गावडे (वय ३६, नांदणी नाका लमानी वसाहत) यांच्याकडे चौकशी केली असता मोटारसायकली आणि डंपर चोरीची कबुली दिली. श्री. मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रमोद वाघ, स्नेहल टकले, सहाय्यक फौजदार सुरेश कोरवी, हेड कॉन्स्टेबल प्रभावती सावंत, निलेश मांजरे, नाईक सुरेश तोडकर, कॉन्स्टेबल संदेश शेटे, रोहित डावळे, वैभव सूर्यवंशी, सचिन चौगुले, काशीराम कांबळे यांनी गुन्हा उघडकीस आणला.

Web Title: Todays Latest Marathi News Jsp22b03095 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..