टुडे पान एक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टुडे पान एक
टुडे पान एक

टुडे पान एक

sakal_logo
By

भाजप-शिंदे गटातील निष्ठावंतांचे लॉबिंग
राज्यपाल नियुक्त आमदार; इच्छुकांची कसोटी; इचलकरंजी, कोल्हापूर उत्तर लक्ष्य
गणेश शिंदे ः सकाळ वृत्तसेवा
जयसिंगपूर, ता. ६ : भाजप आणि शिंदे गटाने राज्यातील महाविकास आघाडी सरकारला पायउतार होण्यास भाग पाडले. राज्यात पुन्हा सत्ता आल्याने जिल्ह्यातील भाजप आणि शिंदे गटातील निष्ठावंत इच्छुकांना राज्यपाल नियुक्त आमदारकीची आशा लागली आहे. आघाडी सरकारने राज्यपालांकडे दिलेली बारा जणांची यादी राजभवनकडून परत मागून नव्याने ती सादर केली जाणार आहे. आघाडी सरकारच्या काळात नोव्हेंबर २०२० मध्ये विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त बारा आमदारांची यादी शिंदे सरकारने मागे घेतली. नव्याने बारा सदस्यांची यादी पाठवली जाणार आहे. यादीत आपले नाव समाविष्ट व्हावे, यासाठी इच्छुकांनी लॉबिंग सुरू केले आहे.
भाजप आणि शिंदे गटातील आमदारांची संख्या लक्षात घेता भाजपकडे बारापैकी आठ ते नऊ जागा मिळण्याचा अंदाज आहे. कला, क्रीडा, सामाजिक, सहकार आदी क्षेत्रांत गौरवास्पद कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना राज्यपाल नियुक्त आमदारकीचा मान दिला जातो. यासाठीच्या निकषांची पडताळणी करून चर्चेनंतर मुख्यमंत्री एकमत झालेली यादी राज्यपालांकडे सादर करतात. तत्कालीन ठाकरे सरकारने सादर केलेल्या यादीत आघाडीतील इच्छुकांच्या नावांचा समावेश केला होता. यात घटक पक्षांचाही विचार केला होता. मात्र, आघाडी सरकारकडून शेतकऱ्यांच्या प्रश्नांची प्रतारणा होत असल्याचा आरोप करून स्वाभिमानी पक्ष सत्तेतून बाहेर पडले. यादीतून आपले नाव वगळावे, अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन केली होती. कालांतराने ठाकरे सरकार गडगडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजभवनकडे पत्रव्यवहार करून ठाकरे सरकार यांची यादी परत मागवली. आता मंत्रिमंडळातीळ चर्चेनंतर नव्याने ही यादी पाठवली जाणार आहे.

यांच्या नावाची चर्चा
राज्यात पुन्हा भाजप-शिंदे युतीचे सरकार आणण्यासाठी ज्या काही तडजोडी कराव्या लागतील त्या करण्याची तयारी भाजपच्या पातळीवर सुरू आहे. त्यातून जिल्ह्यातील जास्तीत जास्त जिंकण्याची रणनीती आखताना विधान परिषदेवर काहींना संधी दिली जाईल. त्यात इचलकरंजीतून माजी आमदार सुरेश हाळवणकर यांना, तर कोल्हापूर उत्तरमधून माजी आमदार राजेश क्षीरसागर व देवस्थानचे माजी अध्यक्ष महेश जाधव यांना संधी दिली जाईल. त्यातून हे दोन्ही मतदारसंघ भाजपसाठी सुरक्षित करण्याचा प्रयत्न असेल. शिंदे गटाच्या कोट्यातून क्षीरसागर यांना तर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या जवळचे म्हणून श्री. जाधव हे विधान परिषदेवर जातील, अशी शक्यता आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Jsp22b03098 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..