सेवा सोसायट्यांच्या बळीकटीकरणास प्राधान्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सेवा सोसायट्यांच्या बळीकटीकरणास प्राधान्य
सेवा सोसायट्यांच्या बळीकटीकरणास प्राधान्य

सेवा सोसायट्यांच्या बळीकटीकरणास प्राधान्य

sakal_logo
By

03869

----------
सेवा सोसायट्यांच्या बळीकटीकरणास प्राधान्य
डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर; जयसिंगपूरमध्ये जिल्हा बँकेची आढावा बैठक
जयसिंगपूर, ता. ११: सामान्य शेतकऱ्‍यांच्या हितासाठीच जिल्हा बँकेची स्थापना झाली आहे. ग्रामीण भागातील अर्थकारणाचा चेहरा-मोहरा बदलायचा असेल तर शेवटच्या माणसापर्यंत जिल्हा बँक पोहोचली पाहिजे. त्यादृष्टीने बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न सुरू आहेत. विकास सेवा सोसायट्या सक्षम असल्या पाहिजेत. त्या नफ्यात चालल्या पाहिजेत. त्यामुळे जिल्हा बँकेच्या माध्यमातून सेवा सोसायट्या अधिक बळकट करण्यासाठी प्राधान्य राहील, असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, माजी मंत्री, आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्‍यांना व्हावी तसेच सेवा सोसायट्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी जयसिंगपूर येथील इदगाह हॉल येथे शिरोळ तालुका विकास सेवा संस्थांची आढावा बैठक झाली. जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक ए. बी. माने, नाबार्डचे व्यवसाय विकास अधिकारी आशितोष जाधव प्रमुख उपस्थित होते. आढावा बैठकीसाठी शिरोळ तालुक्यातील सेवा सोसायट्यांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ व सेक्रेटरी उपस्थित होते.
आमदार यड्रावकर म्हणाले, ‘दोन वर्षात कोरोना प्रादूर्भावामुळे बैठक झाली नाही. या काळात सोसायटीच्या स्तरावर अडचणींचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला. सोसायट्यांनी शेतकऱ्‍यांना कर्ज देणे व त्याची वसुली करणे एवढ्यापुरते मर्यादित न राहता नाबार्डच्या योजनांच्या माध्यमातून अधिक सक्षम होण्यासाठी प्रयत्न करावेत.’
बँकेचे विभागीय अधिकारी एम. जी. दिवटे यांनी स्वागत केले. शेती व कर्ज विभागाचे व्यवस्थापक सी. ए. रावण यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा बँकेचे अकौंटंट बँकींग व ठेव विभागाचे व्यवस्थापक विकास जगताप यांनी बँकेच्या ठेवीसह अन्य योजनांची माहिती दिली. जयसिंग खोंद्रे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन बबन यादव यांनी केले. जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह माने- पाटील, प्रकाश पाटील टाकवडेकर, भालचंद्र कागले, सुरेश शहापुरे, सुभाषसिंग रजपूत, दत्त साखरचे संचालक रणजीतसिंह कदम आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Jsp22b03113 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..