लम्पि | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लम्पि
लम्पि

लम्पि

sakal_logo
By

कबनूरमध्ये तीन गायी दगावल्या
कबनूर ः येथे लम्पीची बाधा झाल्याने तीन गायी दगावल्या तर आणखी जनावरांना लागण झाली आहे. सनदी मळ्यातील संभा टोपकर यांची गाय दगावली आहे. मगदूम मळ्यातील बाळासाहेब मगदूम यांच्या तीन गायींना लागण झाली असून त्यातील दोन गाई दगावल्या आहेत. पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक उपआयुक्त डॉ. यु. डी. भोसले व सहाय्यक पशुधन विकास अधिकारी एस. सी. सर्जे यांनी स्थितीची पाहणी केली. रोगाचा प्रादूर्भाव कमी व्हावा यासाठी कबनूरमध्ये शासनातर्फे लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. दोन दिवसांत सुमारे ४०० जनावरांना लस दिली आहे.

शिरोळमध्ये १२ बाधित
जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यात १२ जनावरांना लम्पीची लागण झाल्याने पशुपालक धास्तावला आहे. तालुक्यात ३० हजाराहुन अधिक गायी व बैलाची संख्या असून यांच्या लसीकरणासाठी शिरोळ तालुक्यात ११ हजार १०० डोस उपलब्ध असून जनावरांचे लसीकरण सुरुवात केली आहे. तालुक्यात ३० हजाराहुन अधिक गायी व बैलाची संख्या असून ५९ हजाराहुन अधिक म्हैस वर्गीय जनावरे आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Jsp22b03145 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..