फेडरल बँकेतर्फे ''यशवंत''मध्ये साहित्य वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फेडरल बँकेतर्फे ''यशवंत''मध्ये साहित्य वाटप
फेडरल बँकेतर्फे ''यशवंत''मध्ये साहित्य वाटप

फेडरल बँकेतर्फे ''यशवंत''मध्ये साहित्य वाटप

sakal_logo
By

03935

-------
यशवंत विद्यालयात साहित्याचे वाटप
जयसिंगपूर, ता. १६ : शतकोत्तर वाटचाल करणाऱ्या येथील यशवंत विद्यालयातील विद्यार्थ्यांना फेडरल बँकेतर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्याता आले
बँकेचे शाखाधिकारी दीपक लठ्ठे म्हणाले, ‘बँकेतर्फे विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. याचाच एक भाग म्हणून शाळेच्या गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले आहे. गरजू विद्यार्थ्यांपर्यंत बँकेची मदत पोहोचत असल्याचे विशेष समाधान वाटते. यापुढेही विद्यालयाच्या मदतीकरता बँक तत्पर असेल.’
संस्थेचे अध्यक्ष विजयराज मगदूम म्हणाले, ‘सर्वसामान्यांची मुले चांगल्या शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून शाळेची स्थापना केली. शाळा शतकोत्तराकडे वाटचाल करत आहे. भागातील बहुतांश अशिक्षित पालकांची मुले येथे गुणवत्तापूर्ण शिक्षण घेत आहेत. शाळेचे अनेक विद्यार्थी आज वेगवेगळ्या क्षेत्रांत कार्यरत आहेत ही बाब वेगळाच आनंद देऊन जाते.’
स्वागत, प्रस्ताविक मुख्याध्यापिका सौ. शारदा चोपडे यांनी केले. यावेळी लठ्ठे, विकास पाटील, विवेक चौगुले, संदीप रायन्नावर यांचा सत्कार करण्यात आला. शिक्षक बाळकृष्ण येलपले, अनिता सुतार, विद्यार्थिनी प्रतिनिधी धनश्री कद्दू उपस्थित होते. जयश्री उदगावे यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Jsp22b03152 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..