जीएसटी अधिकाऱ्याला चार दिवसांची कोठडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जीएसटी अधिकाऱ्याला
चार दिवसांची कोठडी
जीएसटी अधिकाऱ्याला चार दिवसांची कोठडी

जीएसटी अधिकाऱ्याला चार दिवसांची कोठडी

sakal_logo
By

जीएसटी अधिकाऱ्याला
चार दिवसांची कोठडी
जयसिंगपुरातील लाच प्रकरणात कारवाई
जयसिंगपूर, ता. २३ : येथील जीएसटी अधीक्षकावर सीबीआयच्या लाचलुचपत पथकाने सात हजार रुपयांच्या लाचप्रकरणी कारवाई केली. सुरेश महादेव कोरे (वय ५२, रा. कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. दरम्यान, जिल्हा सत्र न्यायालयाने त्याला शुक्रवारी चार दिवसांची कोठडी सुनावली आहे.
याबाबत कारवाई करणाऱ्या पथकाने दिलेली माहिती अशी ः याच कार्यालयातील दोघांवर काही दिवसांपूर्वी अशी कारवाई झाली होती. शहरातील एका खत व्यावसायिकाने जीएसटी कर भरले नसल्यामुळे त्याच्या दुकानाची नोंदणी स्थगित करण्यात आली होती. हा स्थगितीचा आदेश रद्द करण्यात यावा, अशी मागणी व्यावसायिकाने जयसिंगपूर येथील जीएसटी कार्यालयाकडे केली होती. हा आदेश रद्द करण्यासाठी अधीक्षक कोरेने पैशांची मागणी केल्याची तक्रार दाखल झाली होती. सीबीआयच्या पथकाने कोरे याला गुरुवारी सात हजार रुपयांच्या लाच प्रकरणात पकडले. त्याला आज येथील जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले.

Web Title: Todays Latest Marathi News Jsp22b03182 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..