मगदूम अभियांत्रिकीत दांडीया स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मगदूम अभियांत्रिकीत दांडीया स्पर्धा
मगदूम अभियांत्रिकीत दांडीया स्पर्धा

मगदूम अभियांत्रिकीत दांडीया स्पर्धा

sakal_logo
By

मगदूम अभियांत्रिकीत दांडिया स्पर्धा
जयसिंगपूर : येथील डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या सांस्कृतिक विभागातर्फे नवरात्रीनिमित्त दांडिया स्पर्धेचे आयोजन केले. यामध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. उद्‍घाटन संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय मगदूम व उपाध्यक्षा अ‍ॅड. डॉ. सोनाली मगदूम यांनी केले. प्रारंभी महाविद्यालयाच्या मुलींनी ‘हादगा’ खेळाचे सादरीकरण केले. याबद्दल अ‍ॅड. डॉ. सोनाली मगदूम यांनी कौतुक केले. स्वतः रिंगणामध्ये सहभागी झाल्या. सिनेअभिनेते आदित्य घाटगे यांनी गरबा नृत्य परीक्षकाची भूमिका बजावली. कॅम्पस डायरेक्टर डॉ. सुनील आडमुठे, प्र. प्राचार्या डॉ. शुभांगी पाटील यांच्या प्रोत्साहनातून डीन-स्टुडन्टस प्रा. पी. पी. पाटील, सांस्कृतिक विभागप्रमुख डी. आर. माने यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. व्ही. ए. पाटील, प्रा. सौ. कारदगे, प्रा. सौ. फरांडे, प्रा. सौ. चेंडके, किशोर खिलारे आदींनी केले.