मगदूम इंजिनिअरिंग कॉलेजच्या १३ विद्यार्थ्यांची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मगदूम इंजिनिअरिंग कॉलेजच्या १३ विद्यार्थ्यांची निवड
मगदूम इंजिनिअरिंग कॉलेजच्या १३ विद्यार्थ्यांची निवड

मगदूम इंजिनिअरिंग कॉलेजच्या १३ विद्यार्थ्यांची निवड

sakal_logo
By

मगदूम अभियांत्रिकीच्या
१३ विद्यार्थ्यांची निवड
जयसिंगपूर, ता. १३ : येथील डॉ. जे. जे. मगदूम अभियांत्रिकी कॉलेजच्या १३ विद्यार्थ्यांची निवड निहिलेंट कंपनीमध्ये झाल्याची माहिती, महाविद्यालयाचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. सुनील आडमुठे व प्र. प्राचार्या डॉ. सौ. शुभांगी पाटील यांनी दिली.
ग्राहकांच्या गरजा समजावून घेऊन प्रक्रिया तंत्रज्ञान आणि डिझाइनमध्ये त्याचे निराकरण करण्यासाठी सर्व कौशल्य तैनात करणारी कंपनी म्हणून निहिलेंटची ओळख आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये कॉम्प्युटर सायन्स विभागाचे ७, आय. टी. विभागाचे ५ विद्यार्थी व ई. टी. सी. या विभागातून एक विद्यार्थिनी यांचा समावेश आहे. कॉम्प्युटर विभागातून अभिजित नेजे, अखिल बंडगर, अक्षता बाबर, नेहा सूर्यवंशी, संकेत कांबळे, सिजर बनणे, स्वरूपा वेतुरलेकर तर आय. टी. विभागातून अदनान बलबंद, अमोल सुतार, आशिष कवठेकर, मुदस्सीरमते शेख, सुमित कापसे व ई. टी. सी.मधून कोमल बाबू पाटील यांची निवड झाली आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्टचे अध्यक्ष विजय मगदूम, उपाध्यक्षा सोनाली मगदूम यांनी अभिनंदन केले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर प्रा. पी. पी. माळगे यांचे मार्गदर्शन लाभले.