Tue, Feb 7, 2023

जामीन फेटाळला
जामीन फेटाळला
Published on : 18 October 2022, 1:41 am
फसवणूकप्रकरणी जामीन फेटाळला
जयसिंगपूर, ता.१८ : रेल्वेत नोकरी लावतो, असे सांगून बनावट नियुक्तीपत्रे देऊन १० लाख ५२ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी मौलाली शौकत मुल्ला (रा. नागठाणे, ता. वाळवा, जि. सांगली) याच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. मुल्ला याला पोलिसांनी अटक करून मंगळवारी जयसिंगपूर येथील प्रथमवर्ग न्यायालयात उभे केले असता, न्यायालयाने त्याचा जामीन फेटाळला. सरकारी वकील म्हणून सूर्यकांत मिरजे यांनी युक्तिवाद केला.