जयसिंगपूरमध्ये चातुर्मास उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जयसिंगपूरमध्ये चातुर्मास उत्साहात
जयसिंगपूरमध्ये चातुर्मास उत्साहात

जयसिंगपूरमध्ये चातुर्मास उत्साहात

sakal_logo
By

04188
जयसिंगपूर : निर्यापकश्रमण मुनिश्री सिद्धांतसागरजी महाराज यांना नूतन पिच्छी प्रदान करताना आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, स्वरूपा रा. पाटील, स्फूर्ती आदित्य पाटील-यड्रावकर.


जयसिंगपूरमध्ये
चातुर्मास उत्साहात
जयसिंगपूर, ता. १ : मागील चार महिन्यांपासून निर्यापकश्रमण प.पू. १०८ श्री सिद्धांतसागरजी महाराज तसेच प. पू. १०८ श्री अभयसागरजी महाराज, प. पू. १०८ श्री सुप्रभसागरजी महाराज व प. पू. १०८ श्री सुखसागरजी महाराज यांचा चातुर्मास जयसिंगपूर येथील चौथी गल्ली येथील श्री १००८ भ. पार्श्‍वनाथ दि. जैन मंदिरामध्ये मोठ्या उत्साहात झाला.
३० ऑक्टोबर रोजी पूज्यश्रींना पिच्छी प्रदान करून चातुर्मासाचा सांगता सोहळा झाला. जयसिंगपूर येथील इंगळे सभागृहात झालेल्या या सोहळ्यामध्ये मुनिश्री निर्यापकश्रमण सिद्धांतसागरजी महाराज यांना पिच्छी प्रदान करण्याचा मान आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर कुटुंबीयांना मिळाला. इतर मुनिश्रींना पिच्छी प्रदान करण्याचा मान सुनील पाटील-मजलेकर, बाळासाहेब नेंदुर्गे परिवार व चातुर्मास समिती २००२ (युवावर्ग) यांना मिळाला.
मुनिश्रींच्या पाद्यपूजेचा मान महावीर आदगोंडा पाटील, चातुर्मास महिला मंडळ, जंगल ग्रुप युवक व विद्योदय ग्रुप यांना मिळाला. जपमाळ व शास्त्रदानाचा मान अरुण न. चौगुले, श्री. व सौ. सुदर्शन नांद्रेकर, सविता सुभाष पाटील परिवाराला मिळाला. या संघस्थ प. पू. १०८ श्री अभयसागरजी महाराज यांचा चौथा दीक्षा सोहळाही झाला.
सुरूवातीला विविध सवालांचा कार्यक्रम झाला. सवालधारकांच्या हस्ते मुनिश्रींची पाद्यपूजा, जपमाळ, शास्त्र प्रदान आणि पिच्छी प्रदान सोहळा झाला. श्राविकांनी सजविलेल्या पूजा थाळीतून पूजा-अष्टक झाले. प्रतिष्ठाचार्य संदेश उपाध्ये (नेज) यांनी संयोजन केले. यावेळी संगीतकार सचिन चौगुले (उदगाव) यांची साथ लाभली. यावेळी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे संयोजन व नियोजन सर्व मंदिर ट्रस्टी, पदाधिकारी व चातुर्मास कमिटी युवा वर्ग यांनी उत्कृष्टरित्या केले.
चातुर्मासाच्या कळस स्थापनेपासून विविध कार्यक्रम, विधी-विधाने, पर्युषणपर्व आदी कार्यक्रम सुसंपन्न होण्यासाठी तन, मन, धनाने सक्रिय योगदान दिलेले सर्व मान्यवर तसेच सवालधारक, आहारदातार, मुनिसेवक, चौका लावणारे श्रावक-श्राविकांचे विशेष करून युवा पिढीचे ट्रस्टचे उपाध्यक्ष राजेंद्र झेले यांनी मंदिर ट्रस्टी व चातुर्मास समितीतर्फे आभार मानले. पूज्यश्रींच्या मंगल आरतीने सोहळ्याची सांगता झाली.