नुकसान पंचनामे पूर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नुकसान पंचनामे पूर्ण
नुकसान पंचनामे पूर्ण

नुकसान पंचनामे पूर्ण

sakal_logo
By

१ हजार २५६ हेक्टरमधील पिकांचे नुकसान
शिरोळ तालुक्यात पंचनामे पूर्ण ; भरपाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष

जयसिंगपूर, ता.२ : परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाच्यावतीने पूर्ण करण्यात आले. आठवड्याभरात युद्धपातळीवर केलेल्या पंचनाम्यात तालुक्यातील ३५३० शेतकऱ्यांची १ हजार २५६ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याचे नमूद आहे. दोन दिवसांत हा अहवाल शासनाकडे सादर केला जाणारा असून भरपाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
२१ ऑक्टोबरला शिरोळ तालुक्यात ढगफुटीच्या झालेल्या पावसात प्रचंड नुकसान झाले होते. प्रशासनाच्या आदेशानुसार कृषी, महसूल, ग्रामविकास या विभागाच्यावतीने संयुक्तरित्या युध्दपातळीवर सात दिवसांत पंचनामे पूर्ण केले. यात नुकसानग्रस्त शेतकरी आणि त्यांच्या जमिनीची माहिती उपलब्ध झाली आहे. शिरोळ तालुक्यात सहा महसूल मंडलातील ४४ गावांपैकी ४२ गावांत ढगफुटी झाली होती. यात प्रामुख्याने जयसिंगपूर, उदगांव, चिंचवाड, शिरोळ, शिरटी, अर्जुनवाड, नांदणीसह परिसरात शेतीचे प्रचंड नुकसान झाले होते. आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी नुकसानग्रस्त भागाचे तत्काळ पंचनामे सुरू करण्याचे आदेश दिले होते.
तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ, गटविकास अधिकारी शंकर कवितके, तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ५९ कर्मचाऱ्यांकडून पंचनाम्याला सुरूवात केली होती. हे पंचनामे बुधवारी पूर्ण झाले. यात १ हजार २५६ हेक्टरमधील ३५३० शेतकऱ्यांचे नुकसान झाले. तर जिरायतमध्ये १ हजार ५०६ शेतकऱ्यांची ६०० हेक्टरमध्ये, बागायतमध्ये ६४५.५५ हेक्टरमध्ये १ हजार ९४५ शेतकरी तर बहुवार्षिकमध्ये २५ हेक्टरमधील ३६ शेतकऱ्यांचे ‍नुकसान झाले आहे. जिरायतमध्ये भुईमूग, सोयाबीन, उडीद, मूग व इतर, बागायतमध्ये फ्लॉवर, कोबी, टोमॅटो, मिरची यासह सर्व भाजीपाला, फूलपिके, केळी, पपई, तर बहुवार्षिकमध्ये चिकू, पेरू, द्राक्ष आदी पिकांचे नुकसान झाले आहे.