मगदूम अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मगदूम अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची निवड
मगदूम अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची निवड

मगदूम अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची निवड

sakal_logo
By

मगदूम अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची निवड
जयसिंगपूर, ता. ३ : येथील डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या सिव्हिल विभागातील विद्यार्थ्यांची नोकरीसाठी कोअर कंपन्यांसह आय. टी. क्षेत्रातील विविध कंपन्यांमध्ये झाल्याची माहिती महाविद्यालयाचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. सुनील आडमुठे व प्र. प्राचार्या डॉ. शुभांगी पाटील यांनी दिली.
औद्योगिक जगतात आयटीचा वाढता वापर व त्या अनुषंगाने उपलब्ध असणाऱ्या अधिक नोकरीच्या संधी लक्षात घेऊन डॉ. जे. जे. मगदूम महाविद्यालयाने या क्षेत्रातील संबंधित विविध संस्थांशी सामंजस्य करार करून सिव्हिल शाखेतील विद्यार्थ्यांना संबंधित सॉफ्टवेअर क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. कंपन्यांच्या मागणीनुसार विद्यार्थ्यांना सॉफ्टस्कील तसेच विविध सॉफ्टवेअर संबंधित प्रशिक्षण देऊन त्यांचे कौशल्य विकसित केले जाते, अशी माहिती ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. पी. पी. माळगे यांनी दिली.
महाविद्यालयातील सिव्‍हिल विभागाच्या विद्यार्थ्यांमध्ये विप्रो १, एल अँड टी १, कॅप जेमिनी ३, इन्फोसिस ३, टी सी एस १, क्यू स्पायडर १, कॉन्फर १, वरद कॅपिटल ५, जे. जे. रिलाझ ५, इंडोवन्स ५, ट्रेक्नोकॉम १ निवड झाली आहे. विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे चेअरमन डॉ. विजय मगदूम व व्हाईस चेअरपर्सन ॲड. डॉ. सोनाली मगदूम यांनी केले.