बाजार समितीला पेट्रोल पंप मंजूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाजार समितीला पेट्रोल पंप मंजूर
बाजार समितीला पेट्रोल पंप मंजूर

बाजार समितीला पेट्रोल पंप मंजूर

sakal_logo
By

बाजार समितीला पेट्रोल पंप मंजूर
जयसिंगपूर ः जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समिती या संस्थेच्या आर्थिक उत्पन्नामध्ये वाढ व्हावी, संस्थेने नवीन नवीन प्रकल्प हाती घ्यावेत, यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे व कृषी उत्पन्न बाजार समितीवर लक्ष ठेवून संस्थेला मदत करणाऱ्या माजी मंत्री, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे सहकार्य आणि पाठपुराव्यामुळे जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी नवीन पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. यड्रावकर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे बाजार समितीला हा पेट्रोल पंप मंजूर झाला असल्याची माहिती जयसिंगपूर कृषी उत्पन्न समितीचे माजी सभापती सुभाषसिंग रजपूत व विजयसिंह माने-देशमुख यांनी दिली.