क्रांतीअग्रणी बापूंचा विचार पुढे नेणे महत्वाचे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्रांतीअग्रणी बापूंचा विचार पुढे नेणे महत्वाचे
क्रांतीअग्रणी बापूंचा विचार पुढे नेणे महत्वाचे

क्रांतीअग्रणी बापूंचा विचार पुढे नेणे महत्वाचे

sakal_logo
By

क्रांतिअग्रणी बापूंचा विचार पुढे नेणे महत्त्‍वाचे
प्रसाद कुलकर्णी; समाजवादी प्रबोधिनीतर्फे जयसिंगपूरमध्ये व्याख्यान
जयसिंगपूर, ता. ९ : स्वातंत्र्याची फळे समाजाच्या शेवटच्या माणसांना चाखता आली पाहिजेत, त्यांची उन्नत्ती झाली पाहिजे यासाठी क्रांतिअग्रणी जी. डी. बापू अखेरपर्यंत कार्यतर राहिले. तो विचार घेऊन पुढे जाणे महत्त्‍वाचे आहे, असे प्रतिपादन समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
समाजवादी प्रबोधिनीच्या जयसिंगपूर शाखेच्या वतीने क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड जन्मशताब्दी निमित्त आयोजित व्याख्यानात बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. चिदानंद अवळेकर होते. श्री. कुलकर्णी म्हणाले, ‘‘भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात प्रतिसरकारने एक महत्त्‍वाची भूमिका बजावली. ब्रिटिश साम्राज्यशाहीप्रमाणेच एतद्देशीय गुन्हेगारी, दरोडेखोरी, सावकारी, विघातक विकृती विरुद्ध लढण्यासाठी साताऱ्यात प्रतिसरकारची जून १९४३ मध्ये स्थापना झाली. भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात साताऱ्याचे
प्रतिसरकार हे एक तेजस्वी पर्व होते. त्या प्रतिसरकारमध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांनी अतिशय मोलाची भूमिका बजावली. ते आघाडीवरील योद्धे होते.’
मध्यवर्ती युद्धमंडळ, न्यायदान मंडळ, लष्करी प्रशिक्षण केंद्र, जनता कोर्ट, तुफान दल,आघात दल, चवळीसाठी निधी उभारण्यासाठी खजिना लूट, दारूबंदी ते अस्पृश्यता निर्मूलन अशा अनेक माध्यमातून जी. डी. बापूंनी जे काम केलं ते आज स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवातही अतिशय महत्त्वाचे आहे. अतिशय संघर्षशाली जीवन क्रांतिअग्रणी बापू जगले. एक धगधगता इतिहास त्यानी निर्माण केला. क्रांतीच्या मशालीने साम्राज्यवादी अंधार दूर करण्याचा प्रयत्न अखेरपर्यंत अग्रणीपणे ते करत राहिले. सर्वसामान्य जनतेसाठी सरकारने कशी धोरणे राबवली पाहिजेत याचे उदाहरण स्वातंत्र्यपूर्व काळात प्रतिसरकारच्या माध्यमातून, स्वातंत्र्य आंदोलनातून आणि स्वातंत्र्योत्तर काळात, शेती, पाणी, शिक्षण, सहकार, कष्टकरी, कामगार क्षेत्रासह विविध क्षेत्रांतील अफाट कार्यकर्तृत्वातून बापूंनी दाखवून दिल्‍याचे सांगितले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. चिदानंद आवळेकर म्हणाले, ‘‘क्रांतीअग्रणी जी. डी. बापू यांनी स्वातंत्र्य आंदोलनामध्ये ब्रिटिशांच्या विरोधी आणि येथील सावकारशाही व धर्मांध विचारधारे विरोधी केलेले कार्य अतिशय महत्त्वाचे आहे. संघीय विचारधारा ब्रिटिशांची लागूलचालन करत होती. त्यावेळी जी. डी. बापूसारखे देशभक्त लढवय्ये देशासाठी प्राण हातात घेऊन लढत होते. तो वसा आणि वारसा आपण पुढे नेण्याची गरज आहे.’’ के. एस. दानवाडे, ॲड. संभाजी जाधव, कॉ. रघुनाथ देशिंगे, ॲड. गणेश साळुंखे, राजेंद्र खिलारे, ए. एस. पाटील, अशोक शिरगुप्पे, रवी सावंत, चंद्रकांत गुरव, नजीर चौगुले, बी. ए. कऱ्याप्पा आदी उपस्थित होते.