ग्रामदैवत संतुबाई मंदिराचा ब वर्गामध्ये समावेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामदैवत संतुबाई मंदिराचा ब वर्गामध्ये समावेश
ग्रामदैवत संतुबाई मंदिराचा ब वर्गामध्ये समावेश

ग्रामदैवत संतुबाई मंदिराचा ब वर्गामध्ये समावेश

sakal_logo
By

हेरवाडचे संतुबाई मंदिर
जयसिंगपूर: हेरवाड (ता. शिरोळ) येथील ग्रामदैवत संतुबाई मंदिराचा ‘ब’ वर्गामध्ये समावेश झाला असून मंदिर विकासासाठी दोन कोटींच्या निधीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. लवकरच संतुबाई मंदिर परिसर विकासासाठी निधी मंजूर होईल अशी माहिती, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.
हेरवाडमधील संतुबाई मंदिर हे सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असून येथे प्रतिवर्षी मोठ्या प्रमाणात यात्रा भरते. यात्रेनिमित्ताने विविध कार्यक्रम होतात. ग्रामदैवत संतुबाईच्या दर्शनाला परिसरातून हजारो भाविक येतात. या मंदिराचा ‘ब’ वर्गामध्ये समावेश होण्यासाठी सातत्याने केलेल्या प्रयत्नाला यश येऊन मंदिराचा ‘ब’ वर्गात समावेश झाला.