जुगार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुगार
जुगार

जुगार

sakal_logo
By

जयसिंगपुरात जुगार अड्ड्यावर छापा

जयसिंगपूर, ता. १३ : शहरातील दहाव्या गल्लीतील चंद्रहिरा कॉम्प्लेक्समध्ये राजू आप्पा शिकलगार हा जुगार चालवत असताना जयसिंगपूर पोलिसांनी रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कारवाई केली. यावेळी १६ हजार ६२० रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेऊन जुगारअड्डा मालकासह ९ जणांवर जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पो.कॉ. सचिन चौगुले यांनी पोलिसात दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, येथील दहाव्या गल्लीत चंद्रहिरा कॉम्प्लेक्समध्ये राजू शिकलगार हा जुगार अड्डा चालवीत होता. याबाबतची माहिती जयसिंगपूर पोलिसांना मिळाल्यानंतर रविवारी सायंकाळी छापा टाकला. याप्रकरणी राजू आप्पा शिकलगार (वय ६०, रा. जयसिंगपूर), सतीश मायाप्पा केंगारे (वय ४०, रा. जयसिंगपूर), गणेश गुलाब शिरोळकर (वय ५२, रा. संभाजीनगर शिरोळ), सुभान अलम मोबीन (वय ४२, रा. शाहूनगर जयसिंगपूर), अनिल श्रीकांत यड्रावे (वय ६०, रा. गुरुवार पेठ, मिरज), तबरेज बशीर मकानदार (वय २२, रा. कर्मवीर भाऊराव चौक, मिरज), अजय कळोळी गाडीवर (वय ४०, रा. १३ वी गल्ली, जयसिंगपूर), आकाश सुरेश बागडे (वय ३१, रा. जय भवानी चौक, शाहूनगर, जयसिंगपूर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.