आधी सिलेक्शन; मग इलेक्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आधी सिलेक्शन; मग इलेक्शन
आधी सिलेक्शन; मग इलेक्शन

आधी सिलेक्शन; मग इलेक्शन

sakal_logo
By

सरकारनामा, वार्तापत्र… पानावर मंगळवारी घेणे, प्रसिध्द बुधवारी (ता २३)घेणे

शिरोळ तालुका…
गणेश शिंदे


आधी सिलेक्शन; मग इलेक्शन
नवी राजकीय समीकरणे ः सहा गावांना मिळणार महिला कारभारी

गणेश शिंदे ः सकाळ वृत्तसेवा
जयसिंगपूर, ता. २२ : शिरोळ तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर गावच्या सत्तेसाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. सर्वसाधारण गटासाठी आरक्षित असलेल्या औरवाड, कवठेसार, नवे दानवाड, लाटवाडी येथील निवडणुका लक्षवेधी ठरणार आहेत, तर सर्वसाधारण महिला गटासाठी आरक्षित असलेल्या टाकवडे, अब्दुललाट, अकिवाट, उमळवाड, शिवनाकवाडी व खिद्रापूर येथील लढतीदेखील चुरशीच्या ठरणार आहेत. ‘आधी सिलेक्शन, मग इलेक्शन’ असे चित्र सध्या या गावांमध्ये आहे.
तालुक्यातील टाकवडे, अब्दुललाट, अकिवाट, हेरवाड, उमळवाड, संभाजीपूर, औरवाड, कवठेसार, चिंचवाड, कनवाड, हरोली, शिवनाकवाडी, राजापूर, नवे दानवाड, खिद्रापूर, लाटवाडी व राजापूरवाडी या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. यापूर्वीच सरपंच आरक्षण निश्चित झाले आहे. त्यामुळे स्थानिक नेतेमंडळींकडून जोडण्या सुरू झाल्या आहेत. ग्रामपंचायतीच्या निवडणुका स्थानिक गटपातळीवर होत असल्या, तरी नव्या राजकीय समीकरणामुळे स्थानिक पातळीवर होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीलाही तितकेच महत्त्व आले आहे.
तालुक्यात आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी खासदार राजू शेट्टी, काँग्रेसचे नेते गणपतराव पाटील, माजी आमदार उल्हास पाटील यांच्यासह ‘गुरुदत्त शुगर्स’चे अध्यक्ष माधवराव घाटगे, अनिलराव यादव आदी नेतेमंडळी कशी व्यूहरचना आखतात, त्यावर देखील स्थानिक आघाड्या ठरणार आहेत. येत्या २८ पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी ग्रामपंचायतींची ही निवडणूक लढविण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. स्थानिक पातळीवर कशा आघाड्या होतात, याकडेही लक्ष लागून राहिले आहे. एकूणच, ऐन थंडीत निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे.
....

सरपंचपदाचे आरक्षण
टाकवडे-सर्वसाधारण महिला, अब्दुललाट-सर्वसाधारण महिला, अकिवाट-सर्वसाधारण महिला, हेरवाड-अनुसूचित जाती महिला, उमळवाड-सर्वसाधारण महिला, संभाजीपूर-अनुसूचित जाती, औरवाड-सर्वसाधारण, कवठेसार-सर्वसाधारण, चिंचवाड-अनुसूचित जाती, कनवाड-ना. मा. प्रवर्ग, हरोली-ना. मा. प्रवर्ग, शिवनाकवाडी-सर्वसाधारण महिला, राजापूर-अनुसूचित जाती महिला, नवे दानवाड-सर्वसाधारण, खिद्रापूर-सर्वसाधारण महिला, लाटवाडी-सर्वसाधारण, राजापूरवाडी-अनुसूचित जमाती.
....

निवडणुका लागलेली गावे
टाकवडे, अब्दुललाट, अकिवाट, हेरवाड, उमळवाड, संभाजीपूर, औरवाड, कवठेसार, चिंचवाड, कनवाड, हरोली, शिवनाकवाडी, राजापूर, नवे दानवाड, खिद्रापूर, लाटवाडी व राजापूरवाडी.
....