जन्मठेप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जन्मठेप
जन्मठेप

जन्मठेप

sakal_logo
By

खूनप्रकरणी एकास जन्मठेप
जयसिंगपूर: नांदणी (ता.शिरोळ) येथील कैलास दग्गु साळवे याला अमर जयसिंग नलवडे याच्या खूनप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. बी. गुरव यांनी जन्मठेप व पाच हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा मंगळवारी (ता.२२) ठोठावली. हा गुन्हा शिरोळ पोलिस ठाण्यात नोंद होता. हा खटला अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. बी. गुरव यांचे कोर्टात सुरु होता. सरकारी वकील उदय मोहन कुलकर्णी यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले. ४ सप्टेंबर २०१४ ला हा प्रकार घडला होता. सरकार पक्षातर्फे १३ साक्षीदार तपासण्यात आले. या गुन्ह्याचा तपास शिरोळ पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक डी. बी. कदम व पोलिस निरीक्षक व्ही. बी. जगताप यांनी केला. व आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र पाठविले होते. मयत अमर नलवडे याची बहिण मनिषा वडर यांनी फिर्याद दिली होती. कोर्टाने साक्षीपुरावा व सरकारी वकिल उदय मोहन कुलकर्णी यांनी केलेला युक्तीवाद व त्यांनी दिलेल्या सर्वोच्च न्यायालयातील निवाड्याचा संदर्भ घेवून निकाल दिला. याकामी सरकारी पक्षातर्फे शिरोळ पोलिस ठाण्याचे पोलिस कॉनस्टेबल संदीप हेगडे यांनी मदत केली.