जयसिंगपुरात आठ डिसेंबरला बौद्ध धम्म महापरिषद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जयसिंगपुरात आठ डिसेंबरला बौद्ध धम्म महापरिषद
जयसिंगपुरात आठ डिसेंबरला बौद्ध धम्म महापरिषद

जयसिंगपुरात आठ डिसेंबरला बौद्ध धम्म महापरिषद

sakal_logo
By

जयसिंगपुरात डिसेंबरमध्ये बौद्ध धम्म महापरिषद

जयसिंगपूर, ता. २३ : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बौद्ध संस्कार मंडळातर्फे आठ डिसेंबरला ३२ व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म महापरिषदेचे आयोजन केले आहे.
सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत वैशाली बुद्ध विहार, लुंबिनीवन धम्मनगर जयसिंगपूर येथे बौद्ध धम्म महापरिषद होत आहे. डॉ. उपगुप्त महास्थवीर (पूर्णा) अध्यक्षस्थानी असतील. धम्म परिषदेचे उद्‍घाटन महाउपासक ॲड. सी. आर. सांगलीकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी यशकश्यपायन महास्थवीर (जयसिंगपूर), डॉ. एम. सत्यपाल महास्थवीर (औरंगाबाद), रतनबोधी महास्थवीर (चंद्रपूर), ज्ञानरक्षित स्थवीर (औरंगाबाद), आर. आनंद स्थवीर, संबोधी, राहुल (वसगडे कोल्हापूर) उपस्थित राहणार आहेत.
सकाळी दहा वाजता धम्म ध्वजवंदन व पूज्य भिख्खू संघाचे संघास भोजनदान, दुपारी बारा ते पाच भिख्खू संघाची धम्मदेसना तसेच डॉ. उपगुप्त महास्थवीर यांच्या हस्ते प्रा. डॉ. एम. सत्यपाल महास्थवीर संपादित बुद्ध संदेश मासिकेचे प्रकाशन होणार आहे. संयोजकांतर्फे महापरिषदेची तयारी केली जात आहे. कोल्हापूर, सांगलीसह महाराष्ट्र आणि कर्नाटकातून समाज बांधव उपस्थित राहणार आहेत. रमाई उपासिका संघ जयसिंगपूर, शिरोळ तालुका बौद्ध धम्म प्रचार समिती, नालंदा सार्वजनिक ग्रंथालय जयसिंगपूर, पंचशील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित जयसिंगपूर, बहुजन व सामाजिक संस्था आणि तरुण मंडळाच्यावतीने संयोजन केले जात असल्याची माहिती अध्यक्ष रमेश कांबळे, उपाध्यक्ष मारुती बल्लाळ, सचिव शशिकांत माळगे, सहशिक्षण धनंजय कर्णिक, तसेच श्रावण कामत यांनी दिली.