‘माझे संविधान’ उपक्रम शनिवारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘माझे संविधान’ उपक्रम शनिवारी
‘माझे संविधान’ उपक्रम शनिवारी

‘माझे संविधान’ उपक्रम शनिवारी

sakal_logo
By

‘माझे संविधान’ उपक्रम शनिवारी
जयसिंगपूर : नगरपालिका व भारतीय संविधान गौरव समितीतर्फे शहरात शनिवारी (ता. २६) माझे संविधान माझा अभिमान, हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. शाळा, कॉलेज, महाविद्यालयामध्ये संविधान दिन साजरा करण्याबाबत नियोजन बैठक झाली. बैठकीत शालेयस्तरावर निबंध, वक्तृत्व, घोषवाक्य, स्वरचित काव्यलेखन, पोस्टरनिर्मिती यासह विविध स्पर्धा घेण्याबाबत ठरले. शहरातील शाळांच्या परिसरातील किमान चार ते पाच चौकामध्ये संविधान रॅली काढून सकाळी दहा वाजता एकाच वेळी भारतीय संविधानातील उद्देशिकेचे वाचन करण्यात येणार आहे. क्रांती चौक एसटी स्टँडजवळ विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून शहराच्या वतीने सार्वजनिक संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात येणार आहे. आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. बैठकीस मुख्याधिकारी तैमुर मुलाणी, प्रफुल्लकुमार वनखंडे उपस्थित होते.