जयसिंगपूरमध्ये गुरूचरित्र पारायण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जयसिंगपूरमध्ये गुरूचरित्र पारायण
जयसिंगपूरमध्ये गुरूचरित्र पारायण

जयसिंगपूरमध्ये गुरूचरित्र पारायण

sakal_logo
By

जयसिंगपूरमध्ये
गुरूचरित्र पारायण
जयसिंगपूर, ता.२४ : येथील श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास केंद्रामार्फत श्री दत्त जयंतीनिमित्त अखंड नाम, यज्ञ, जप, याग आणि श्री गुरुचरित्र पारायण होणार आहे. १ ते ८ डिसेंबरदरम्यान सोहळा होणार आहे. याकाळात ल.पा. गर्ल हायस्कूल शेजारील श्री स्वामी समर्थ मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. बुधवारी (ता.३०) ग्रामदेवता सन्मान मंडल मांडणी पूर्वतयारी, गुरुवारी (ता.१ ) मंडल व अग्नी स्थापना आणि गुरुचरित्र पारायणास प्रारंभ होणार आहे. शुक्रवारी (ता.२) श्री गणेश व मनोबोध याग, शनिवारी (ता.३) गीताई याग, रविवारी (ता.५) चंडी याग सोमवारी (ता.५) स्वामी याग, मंगळवारी (ता.५) रुद्र व मल्हारी याग, बुधवारी (ता.६) बलिपूर्णा होती असे यज्ञ यागबरोबर दररोज सकाळी नऊ वाजता नित्यस्वाहाकार होणार आहे. बुधवारी दुपारी १२ वाजून ३९ श्री दत्त जन्मोत्सव आहे. गुरुवारी (ता.७) सत्य पूजन, देवता विसर्जन आणि गुरुचरित्र पारायणाची सांगता होईल.