पोलिस कोठडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस कोठडी
पोलिस कोठडी

पोलिस कोठडी

sakal_logo
By

मारहाणप्रकरणी पोलिस कोठडी
जयसिंगपूर: कनवाड, कुटवाड गावातील मुलांचा झालेला वाद घालवाड रोडवर मिटवल्याचा राग मनात धरून अनिरुद्ध अनिल कोळी याच्यावर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना बुधवारी (ता. २३) घडली होती. याप्रकरणी अभिजित राजेंद्र जाधव (वय २२), वैभव भगवान ऊर्फ अशोक पाटील (वय २२), अजय राजाराम माने (वय २० सर्व, रा. शिरोळ) या तिघांना शिरोळ पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना जयसिंगपूर येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता तिघांना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सरकारी वकील म्हणून सूर्यकांत मिरजे यांनी युक्तिवाद केला.