स्वामी समर्थांच्या पादुका शनिवारी जयसिंगपूरमध्ये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वामी समर्थांच्या पादुका शनिवारी जयसिंगपूरमध्ये
स्वामी समर्थांच्या पादुका शनिवारी जयसिंगपूरमध्ये

स्वामी समर्थांच्या पादुका शनिवारी जयसिंगपूरमध्ये

sakal_logo
By

स्वामी समर्थांच्या पादुका
शनिवारी जयसिंगपूरमध्ये
जयसिंगपूर, ता. १ : अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या श्री स्वामी समर्थ पादुका पालखीचे जयसिंगपूर शहरात आगमन होत आहे. शनिवारी (ता. ३) ते सोमवारी (ता. ५) या काळात शहरातील श्री स्वामी समर्थ चौक बारावी गल्ली येथे श्री स्वामी समर्थ पालखी सोहळा होत आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शनिवारी सकाळी नऊ वाजता ''श्रीं''च्या पालखीचे आगमन, सायंकाळी सात वाजता ''श्रीं''ची आरती. रविवारी पहाटे चार वाजता श्री स्वामी समर्थांची काकड आरती व अभिषेक, दुपारी बारा वाजता ''श्रीं''ची आरती, सायंकाळी सात वाजता ''श्रीं''ची धुपारती. सोमवारी पहाटे चार वाजता अभिषेक व काकड आरती, सकाळी नऊ वाजता पालखीचे प्रयाण असे कार्यक्रम होणार असल्याची माहिती संयोजक बबनराव हतळगे यांनी दिली.