जिल्ह्यातील ३ बाजार समिती निवडणूका स्थगित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यातील ३ बाजार समिती निवडणूका स्थगित
जिल्ह्यातील ३ बाजार समिती निवडणूका स्थगित

जिल्ह्यातील ३ बाजार समिती निवडणूका स्थगित

sakal_logo
By

बाजार समितीच्या निवडणुकांना ब्रेक

जिल्ह्यातील कोल्हापूर, जयसिंगपूर, गडहिंग्लज समित्यांचा समावेश

कोल्हापूर/जयसिंगपूर, ता. २ : बाजार समिती आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका एकाच वेळी लागल्याने ग्रामपंचायत सदस्यांना बाजार समितीच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क मिळाला पाहिजे, असा सूर होता. राज्यभरातून ही मागणी होत असल्याने अखेर ग्रामपंचायत सदस्यांना बाजार समितीच्या मतदानाचा हक्क मिळणार आहे. बाजार समितीच्या निवडणुका १५ मार्च २०२३ पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यातील कोल्हापूर, जयसिंगपूर, गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांना ब्रेक लागला आहे.
राज्यातील होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या सदस्यांना बाजार समिती निवडणुकीत मतदानाचा हक्क मिळावा यासाठी सध्या सुरू असलेल्या निवडणूक कार्यक्रमाला १५ मार्चपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. त्यानंतर नवीन निवड झालेल्या सरपंच सदस्यांची यादी झाल्यानंतर या बाजार समितीच्या निवडणुका पुन्हा घेण्यात येणार आहे.
यात जिल्ह्यातील कोल्हापूर, जयसिंगपूर, गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितींचा समावेश आहे. कोल्हापूर, जयसिंगपूर, गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी मतदान २९ जानेवारी रोजी होणार होते. २३ नोव्हेंबरपर्यंत प्रारूप मतदार यादीवर आक्षेप, हरकती मागवणे व २३ नोव्हेंबर ते २ डिसेंबरपर्यंत हरकतीवर निर्णय घेणे व ७ डिसेंबर रोजी मतदार याद्या अंतिम होणार होत्या.
अशातच या मतदार याद्यात मुदत संपलेल्या सदस्यांची नावे मतदार यादीत आली. शिवाय नवीन निवडून येणाऱ्या सदस्यांना बाजार समितीसाठी मतदान करता येणार नव्हते. त्यामुळे राज्य शासनाने ग्रामपंचायतीच्या निवडणुका होईपर्यंत बाजार समितीच्या निवडणुका पुढे घ्याव्यात, असे पत्र दिले होते. अखेर याला १५ मार्चपर्यंत स्थगिती मिळाली असून या मुदतीत नवीन निवड झालेल्या सरपंच, सदस्यांची नावे बाजार समितीच्या ग्रामपंचायत सदस्य गटात समाविष्ट करण्यासाठी मुदत दिली आहे.
.....

चौकट आहे ....