Wed, Feb 8, 2023

आत्महत्या रोखली
आत्महत्या रोखली
Published on : 9 December 2022, 6:43 am
विद्यार्थ्याची आत्महत्या पोलिसांनी रोखली
जयसिंगपूर : परीक्षेत कमी मार्क पडल्याने येथील पंधरा वर्षीय शालेय विद्यार्थ्याने आत्महत्या करणार असल्याची चिठ्ठी लिहून ठेवला व तो घरातून गेला होता. दरम्यान, कुटुंबीयांनी तत्काळ जयसिंगपूर पोलिसांत धाव घेऊन घटना सांगितली. त्यानंतर तातडीने पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के व त्यांच्या पथकाने मोबाईल लोकेशन काढून तमदलगे (ता. शिरोळ) येथील रेल्वे स्टेशन परिसरात धाव घेतली. दरम्यान, आत्महत्या करण्याच्या तयारीत असलेल्या विद्यार्थ्यांला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याबरोबर त्याचे मनपरिवर्तन करून त्याला कुटुंबीयांच्या ताब्यात दिले. या वेळी पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के, बाबा पटेल, रोहित डावाळे यांच्या तत्परतेने शालेय विद्यार्थ्याचा जीव वाचल्याने जयसिंगपूर पोलिसांचे कौतुक होत आहे.