कल्पद्रुम आराधना महामंडल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कल्पद्रुम आराधना महामंडल
कल्पद्रुम आराधना महामंडल

कल्पद्रुम आराधना महामंडल

sakal_logo
By

जयसिंगपुरात कल्पद्रुम
आराधना महोत्सवाचे आयोजन

२६ जानेवारी ते ३ फेब्रुवारीदरम्यान विविध कार्यक्रम

जयसिंगपूर, ता.११: शहरातील श्री १००८ भगवान पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्टच्या वतीने २६ जानेवारी २०२३ ते ३ फेब्रुवारीपर्यंत श्री कल्पद्रुम आराधना महामंडल, विधान महामहोत्सव व विश्वशांती महायज्ञाचे आयोजन केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच या विधानाचे आयोजन होत असल्याची माहिती, भगवान पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.
आचार्य श्री. वर्धमान सागरजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मसागरजी महाराज, विद्यासागरजी महाराज, सिद्धांतसागरजी महाराज व त्यांचा महासंघ व मुनीजन यांच्या सान्निध्यात विधान व सर्व धार्मिक विधी होणार आहेत.
नऊ दिवस चालणाऱ्या या कल्पद्रुम आराधना महोत्सव व विश्वशांती महायज्ञ समारंभामध्ये नित्य पूजा पाठ, धार्मिक विधी, प्रवचन, सरस्वती संस्कार, मौजी बंधन, गर्भसंस्कारासह धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट जयसिंगपूरच्या वतीने या महोत्सवाची सर्व तयारी पूर्ण होत आली असून कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांसह शेजारच्या कर्नाटक राज्यामधून श्रावक-श्राविका मोठ्या संख्येने या विधान महोत्सवामध्ये सहभागी होणार आहेत. सर्वांच्या स्वागताची तयारी दिगंबर जैन मंदिर ट्रस्टचे सर्व ट्रस्टी, वीर सेवादलाचे कार्यकर्ते, वीर महिला मंडळाच्या भगिनी आणि विविध संस्थांचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून सुरू आहे. नेटक्या नियोजनासह नऊ दिवस चालणारा हा धार्मिक समारंभ उत्साही वातावरणात पार पडेल, असेही आमदार राजेंद्र पाटील यांनी सांगितले. यावेळी दिगंबर जैन मंदिर ट्रस्टचे सर्व ट्रस्टी, पदाधिकारी उपस्थित होते.