Sun, Jan 29, 2023

मुलाला वाचविले
मुलाला वाचविले
Published on : 14 December 2022, 3:53 am
पाण्यात बुडणाऱ्या मुलास वाचवले
जयसिंगपूर : येथील जलतरण तलावामध्ये १३ वर्षांच्या मुलाला फिट आल्याने पाण्यात बुडत असलेला मुलगा येथील बालरोग तज्ज्ञ डॉ. रियाज अत्तार व लाईफ गार्ड आशिष कुरुंदवाडे यांच्या सतर्कतेमुळे वाचला. डॉ. अत्तार हे आपल्या मुलासह जलतरण तलावामध्ये पोहण्याच्या सरावासाठी आले होते. यावेळी तेरा वर्षांचा मुलगा पोहत असताना फिट आल्याने तो पाण्यात बुडत होता. अशावेळी प्रसंगावधान राखत कुरुंदवाडे यांनी सतर्कतेमुळे त्याला बाहेर काढले. त्यानंतर डॉ. अत्तार यांनी तत्काळ उपचार केले.