Sun, Jan 29, 2023

राज्यस्तरीय वधू-वर, पालक परिचय मेळावा
राज्यस्तरीय वधू-वर, पालक परिचय मेळावा
Published on : 15 December 2022, 2:34 am
जयसिंगपूर लिंगायत समाजातर्फे मेळावा
जयसिंगपूर : जयसिंगपूर लिंगायत समाजातर्फे ३३ व्या राज्यस्तरीय वधू-वर, पालक परिचय मेळाव्याचे आयोजन केले आहे. येथील रविवारी (ता.२५) सकाळी अकरा वाजता सन्मती हॉल, यशवंत हाऊसिंग सोसायटी पोस्ट ऑफिसमागे मेळावा होणार आहे. इराया नागय्या स्वामी यांच्या हस्ते आणि दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मेळाव्याचा प्रारंभ होणार आहे. इच्छुकांनी श्री महात्मा बसवेश्वर पतसंस्था जयसिंगपूर, शैलेश आडके येथे संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.