उदगावमध्ये झोपड्या हटवण्याची कार्यवाही सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उदगावमध्ये झोपड्या हटवण्याची कार्यवाही सुरू
उदगावमध्ये झोपड्या हटवण्याची कार्यवाही सुरू

उदगावमध्ये झोपड्या हटवण्याची कार्यवाही सुरू

sakal_logo
By

उदगावमध्ये झोपड्या हटवण्याची कार्यवाही सुरू

जयसिंगपूर, ता. १५ : उदगाव (ता. शिरोळ) येथे शशिकला क्षय रुग्णालयाच्या जागेवरील झोपड्या हटवण्याची कार्यवाही सुरू आहे. उपजिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत संबंधितांना आदेश दिले आहेत.
शशिकला क्षय रुग्णालयाची ४२ एकर जागा आहे. येथे शशिकला क्षय रुग्णालय कार्यान्वित असून सध्या ग्रामीण रुग्णालय उभारण्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर तेथे मनोरुग्णालयही मंजूर झाले आहे. परिसरात अनेक नागरिकांनी झोपड्या यासह अतिक्रमणे उभारली आहेत. त्यामुळे ही अतिक्रमणे तत्काळ हटवावीत, असे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांनी वर्षभरापूर्वी दिले होते. त्याची कार्यवाही आता सुरू झाली आहे.
उदगाव येथे महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग या नावाने ४२ एकरांचा परिसर आहे. यामध्ये ६० वर्षांपासून पाच जिल्ह्यांचे क्षय रुग्णालय सुरू आहे. सध्या बिरोबा मंदिरसमोर, क्षय रुग्णालयाच्या पाठीमागील बाजूस शिरोळ रोडलगत अशा नागरिकांनी झोपड्या घालून अतिक्रमण केले आहे. सध्या येथे ग्रामीण रुग्णालय होत असून बांधकाम सुरू आहे.
त्याचबरोबर महिनाभरापूर्वी मनोरुग्णालयासाठी तत्वतः मान्यता मिळाली आहे. जिल्हाधिकारी यांनी या शासकीय जागेवर असलेली अतिक्रमणे काढण्यासाठी तलाठी, मंडल अधिकारी, ग्रामविकास अधिकारी आदी प्रशासनाने जागा ताब्यात घ्यावी तसेच कुणी अडथळा आणण्याचा प्रयत्न करीत असेल तर पोलिस ठाण्यात फिर्याद द्यावी, शासकीय अधिकाऱ्‍याने पोलिस ठाण्यातच फिर्याद देण्यासाठी एकमेकांवर ढकलल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.
दरम्यान, शशिकला क्षय रुग्णालयाच्या प्रशासनाकडून झोपड्या घातलेल्या अतिक्रमणधारकांना अतिक्रमण हटवण्याच्या सूचना दिल्या आहेत; मात्र या जागेवरून झोपड्या हटलेल्या नाहीत. त्यामुळे प्रशासनाकडून पुढील कारवाई करण्यात येणार आहे.