Tue, Feb 7, 2023

दारू कारवाई
दारू कारवाई
Published on : 15 December 2022, 5:40 am
दानोळी हातभट्टीच्या अड्ड्यावर छापा
जयसिंगपूर : दानोळी (ता. शिरोळ) येथे छापा टाकून हातभट्टीच्या अड्ड्यावर कारवाई करून १ लाख ५२ हजार ६०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी तुकाराम यशवंत जाधव व किरण संभाजी गुजले (रा. दानोळी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी रात्री स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईत पोलिस निरीक्षक संजय गोर्ले, पोलिस उपनिरीक्षक शेष मोरे, प्रकाश पाटील, संजय हुंबे, वसंत पिंपळे, तुकाराम राजगिरे, अनिल पास्ते, विलास किरोळकर, शिवानंद मठपती यांच्या पथकाने सहभाग घेतला.