Thur, Feb 9, 2023

शिरोळातील खराब रस्त्यांची होणार दुरुस्ती
शिरोळातील खराब रस्त्यांची होणार दुरुस्ती
Published on : 25 December 2022, 1:38 am
शिरोळातील खराब
रस्त्यांची होणार दुरुस्ती
जयसिंगपूर : पावसामुळे दिवाळीपर्यंत रखडलेले शिरोळ तालुक्यातील राज्य मार्ग असलेले रस्ते खराब व नादुरुस्त झाले होते. या राज्य मार्ग रस्त्यांचे मजबुतीकरण करण्यासाठी निधी मिळावा, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून शासनाकडे आपण मागणी केली होती. त्याला मान्यता मिळाली असून नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी बजेटमधून शिरोळ तालुक्यातील या खराब झालेल्या राज्य मार्ग रस्त्यांसाठी दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली. लवकरच या सर्व रस्त्यांच्या कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल असे त्यांनी सांगितले.