चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चोरी
चोरी

चोरी

sakal_logo
By

कोथळीत पाच ठिकाणी चोरीचा प्रयत्न
जयसिंगपूर ः कोथळी (ता. शिरोळ) येथे पाच ठिकाणी चोरी केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. चोरट्यांनी बंगल्यासह मेडिकल, बेकरीसह इतर ठिकाणी कडीकोयंडा, कुलूप तोडून चोरी केली. एका मेडिकल दुकानातून रोकड चोरीस गेली आहे. कोथळी येथे मगदूम गल्लीत मध्यरात्री दोन मेडिकल दुकानाच्या शटरची कुलुपे चोरट्यांनी तोडली. किराणा दुकान व बेकरीमध्ये देखील चोरीचा प्रयत्न झाला. बंगल्याचा कडीकोयंडा उचकटून चोरीचा प्रयत्न करण्यात आला. चोरीच्या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.