३ जानेवारीला जैन समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

३ जानेवारीला जैन समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा होणार
३ जानेवारीला जैन समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा होणार

३ जानेवारीला जैन समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा होणार

sakal_logo
By

सकल जैन समाजातर्फे ३ ला
जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
जयसिंगपूर, ता. २८ : शिखरजी बचाव लढा यशस्वी करण्यासाठी सकल जैन समाज बांधवांतर्फे मंगळवारी (ता. ३) कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. जैन बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन प.पू.स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांनी केले.
नांदणी (ता. शिरोळ) येथे प.पू. स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठातर्फे सकल जैन समाजातर्फे दिगंबर, श्वेतांबर, स्थानकवासी, मूर्तिपूजक, तेरापंती, वीसपंती, मारवाडी आदी समाजाच्या पदाधिकर्‍यांच्या बुधवारी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले, ‘चोवीस तीर्थंकर मोक्षस्थान असलेले सम्मेद शिखरजी हे अनादिकाळापासून जैन धर्मियांचे हृदय आहे.’ प.पू. स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी म्हणाले, मते मागायला लोकप्रतिनिधी येतात. मग जैन समाजाच्या प्रश्नावर ते बोलत नाहीत. अहिंसेच्या मार्गाने मोर्चा काढून सरकारला ताकद दाखवून देऊ. मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे त्यांनी आवाहन केले. यावेळी सावकार मादनाईक, रावसाहेब पाटील, आदित्य पाटील यड्रावकर, अनिल बागणे, डॉ. महावीर अक्कोळे, दादासो पाटील चिंचवाडकर, राजेंद्र झेले, सागर मादनाईक, सागर शंभूशेटेंसह पदाधिकारी उपस्थित होते.