उपसरपंच निवडी १२ जानेवारीला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उपसरपंच निवडी १२ जानेवारीला
उपसरपंच निवडी १२ जानेवारीला

उपसरपंच निवडी १२ जानेवारीला

sakal_logo
By

उपसरपंच निवडी १२ जानेवारीला
शिरोळ तालुका; १७ ग्रामपंचायतींसाठी घडामोडी गतिमान

जयसिंगपूर, ता. ४ : जनतेतून सरपंचपदाची निवडणूक झाल्यानंतर उपसरपंच पदासाठी सदस्यांना डोहाळे लागले आहेत. उपसरपंच पदासाठी इच्छुकांनी सदस्यांची मनधरणी आतापासूनच सुरू केली आहे.
१२ जानेवारीला तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीत उपसरपंचांची निवड केली जाणार आहे. नूतन सरपंचांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंचपदाच्या निवडी होणार आहेत. शिरोळ तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबरला मतदान झाले. २० रोजी निकालानंतर इच्छुकांनी उपसरपंच पदासाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली होती. मात्र, जिल्हा प्रशासनाने १२ जानेवारीला १७ ग्रामपंचायतींच्या उपसरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर या घडामोडींना वेग आला आहे. काही कारणांनी सरपंच निवडीच्या बैठकीस अनुपस्थित राहिले, तर येथे पीठासन अधिकारी नेमण्याचे अधिकार तहसीलदारांना दिले आहेत. पहिल्याच सभेची नोटीस नूतन ग्रामपंचायत सदस्यांना लागू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. काठावरचे बहुमत असलेल्या गावांमध्ये उपसरपंच निवडीकडे विशेष लक्ष लागले आहे.
ग्रामपंचायतींमध्ये इर्षेने, चुरशीने निवडणूक झाली असल्याने या गावातील उपसरपंच निवडीतही ताकद पणाला लावण्यात आली आहे. स्थानिक नेत्यांपासून तालुका पातळीवरील नेत्यांनी आपल्या गटाच्या सदस्याला उपसरपंचपदाचा बहुमान देण्यासाठी कंबर कसली आहे. सदस्यांना अनेक आश्वासने देत उपसरपंच पदावर दावा केला जात आहे.
....

उपसरपंच निवडीची गावे
टाकवडे, अब्दुललाट, अकिवाट, हेरवाड, उमळवाड, संभाजीपूर, औरवाड, कवठेसार, चिंचवाड, कनवाड, हरोली, शिवनाकवाडी, राजापूर, नवे दानवाड, खिद्रापूर, लाटवाडी, राजापूरवाडी.