जयसिंगपूरला ‘कल्पद्रूम आराधना’ महामहोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जयसिंगपूरला ‘कल्पद्रूम आराधना’ महामहोत्सव
जयसिंगपूरला ‘कल्पद्रूम आराधना’ महामहोत्सव

जयसिंगपूरला ‘कल्पद्रूम आराधना’ महामहोत्सव

sakal_logo
By

जयसिंगपूरला ‘कल्पद्रूम आराधना’ महामहोत्सव
राजेंद्र पाटील-यड्रावकर; २६ जानेवारी ते ३ फेब्रुवारीदरम्यान आयोजन
जयसिंगपूर, ता. १७ : येथील श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्टतर्फे प्रथमच भव्य समवशरण रचनासहित श्री कल्पद्रूम आराधना महामंडल विधान महामहोत्सव व विश्वशांती महायज्ञ होणार आहे. महामहोत्सव २६ जानेवारी ते ३ फेब्रुवारीअखेर होणार असल्याची माहिती दिगंबर जैन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष तथा आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यड्रावकर म्हणाले, ‘श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. जिन मंदिराच्या अमृतवर्षपूर्तीनिमित्त जयसिंगपूर नगरीच्या इतिहासामध्ये प्रथमच श्री कल्पद्रूम आराधना महामंडल विधान महामहोत्सव व विश्वशांती महायज्ञ होणार आहे. आचार्य सन्मतिसागर महाराज, आचार्य वर्धमानसागर महाराज यांचे परमशिष्य धर्मसागर महाराज, विद्यासागर महाराज व सिद्धांतसागर महाराज संघ यांच्या सान्निध्यामध्ये स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ, नांदणी व स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ, कोल्हापूर यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी होणार आहेत.’
२६ तारखेला कल्पद्रूम विधान प्रारंभ होणार आहे. २ फेब्रुवारीपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. यासाठी नागरिकांनी मदत केली असून भव्य कार्यक्रम होणार आहेत. जयसिंगपूर व परिसरातील भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन यड्रावकर यांनी केले आहे. यावेळी राजेंद्र नांद्रेकर, प्रकाश निटवे, दादासो पाटील चिंचवाडकर, रमेश इंगळे, स्वप्नील इंगळे, सुनील पाटील मजलेकर, राजेंद्र झेले, शरद मगदूम आदी उपस्थित होते.