चकोते बेकरी कार्यक्रम

चकोते बेकरी कार्यक्रम

फोटो आहे....
.............

चकोते यांनी गुणवत्तेचे ब्रँड निर्माण केले
---
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी; नांदणी येथे चकोते ग्रुपच्या अद्ययावत प्रकल्पाचा प्रारंभ
जयसिंगपूर, ता. २८ : गणेश बेकरीचे अण्णासाहेब चकोते यांनी गुणवत्तेचे ब्रँड निर्माण केले आहेत. परदेशातून मशिनरी आणून त्यांनी भागाचा विकास केला. त्यांच्या उद्योगातून आज २५ हजार जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. स्पर्धेच्या क्षेत्रातही त्यांनी बेकरी व्यवसायात केलेले कार्य प्रेरणा देणारे असल्याचे गौरवोद्‍गार केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी काढले.
नांदणी (ता. शिरोळ) येथील चकोते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या अद्ययावत प्रकल्पाचा प्रारंभ त्यांच्या हस्ते आज करण्यात आला. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील अध्यक्षस्थानी होते. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
मंत्री गडकरी म्हणाले, की नांदणीसारख्या ग्रामीण भागातून बेकरी उद्योगातून श्री. चकोते यांनी लौकिक मिळविला आहे. बेकरी व्यवसायात ब्रँड बनविणे खूप कठीण आहे. एकविसाव्या शतकात गुणवत्ता आणि विश्वसनीयता याचा भांडवल म्हणून उपयोग झाला पाहिजे. पैसा आणि टेक्नॉलॉजी मिळूनही शॉर्टकटने मिळविलेले यश फार काळ टिकत नाही. ब्रँडिंगसाठी खूप वर्षे परिश्रम घ्यावे लागतात. चकोते यांनी नम्रतेने व्यवसायात यश मिळविले आहे. सामाजिक कार्यातही त्यांचे योगदान असते. गुणवत्ता, पॅकिंग, मार्केटिंग हे व्यवसायात महत्त्वाचे ठरते. मराठी माणसाला पुढे न्यायचे असेल तर उद्योग आणि व्यवसायाच्या क्षेत्रात आणखीन गती वाढणे गरजेचे आहे. तरुणांनी नोकरी मागणारे नको, तर नोकरी देणारे होणे अपेक्षित आहे.
मंत्री पाटील म्हणाले, की चकोते ग्रुपच्या माध्यमातून हजारो लोकांना रोजगार मिळाला आहे. दुष्काळ, महापूर, कोरोनासारख्या काळातही चकोते यांचे कार्य अद्वितीय आहे. नांदणी हे भाजीपाल्यासाठी प्रसिद्ध असणारे गाव आहे. मात्र, नांदणीची ओळख भाजीपाल्याबरोबरच गणेश बेकरी म्हणूनही जगभर पोचली आहे. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनीही चकोते यांच्या कार्याचे कौतुक केले.
चकोते म्हणाले, की चकोते ग्रुपच्या माध्यमातून हजारो लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. रोजच्या खाण्यातील उत्पादने ग्राहकांना देत असताना त्याची गुणवत्ता जपली आहे. जपान, जर्मनी आदी देशांतून प्रकल्प या ठिकाणी आणले आहेत. याठिकाणी १५० उत्पादने उपलब्ध करून दिली. आता भारताची बाजारपेठ काबीज करण्यासाठी चकोते ग्रुप सज्ज आहे. लवकरच उत्पादने निर्यात होतील, तो क्षण उद्योग समूहासाठी सुवर्णक्षण असेल.
या वेळी खासदार धनंजय महाडिक, धैर्यशील माने, संजयकाका पाटील, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, प्रकाश आवाडे, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार सुरेश हाळवणकर, उल्हास पाटील, डॉ. सुजित मिणचेकर, दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, ललित गांधी, ‘गुरुदत्त शुगर्स’चे राहुल घाटगे, मकरंद देशपांडे, बाबा देसाई, शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, संजय पाटील-यड्रावकर, प्रांताधिकारी विकास खरात, तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ, सरपंच संगीता तगारे, राजवर्धन नाईक-निंबाळकर उपस्थित होते. संचालक सतीश चकोते यांनी आभार मानले.
....

आणखी ५० चकोते हवेत
केंद्रीय मंत्री गडकरी यांनी आपल्या भाषणात बेकरीच्या माध्यमातून चकोते यांनी केलेल्या प्रगतीचा दाखला देत जिल्ह्यात आणखी ५० चकोते निर्माण झाले तर जिल्ह्याचा विकास सातासमुद्रापार जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
....

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com