अपघात प्रकरणी एकास शिक्षा

अपघात प्रकरणी एकास शिक्षा

अपघात करून मृत्यूस
कारणीभूत ठरल्याप्रकरणी शिक्षा
जयसिंगपूर, ता. १७ : अपघात करून महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी येथील प्रथमवर्ग न्यायालयाने रवींद्र श्रीधर तांबडे (वय ४६, रा. मुंबई) याला आज दीड वर्ष शिक्षा व दोन हजार ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील सूर्यकांत मिरजे यांनी काम पाहिले.
२१ एप्रिल २०१६ ला शिरोळ येथील विजय यशवंत चुडमुगे हे पत्नी वर्षा यांच्यासह मोटारसायकलवरून जयसिंगपूरकडे येत असताना दत्त कारखान्यासमोर आले असता आरोपी रवींद्र तांबडेने कारने चुडमुगे यांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली. त्यात विजय चुडमुगे जखमी झाले. पत्नी वर्षा गंभीर जखमी होऊन उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. विशेष सरकारी वकील सूर्यकांत मिरजे यांनी युक्तिवाद केला, की जखमी विजय चुडमुगे आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदार हुसेन जहागीरदार व अरुण चव्हाण यांच्या जबाबामधून आरोपीची चूक शाबीत होते. तसेच, रहदारीच्या ठिकाणी कार सावकाश चालवावी, याचे भान आरोपीने ठेवले नाही. वेगात येऊन चुकीच्या दिशेला वाहन नेले. त्यामुळे एका महिलेचा जीव गेला व पती जखमी झाला. सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपी तांबडे यास शिक्षा सुनावली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com