पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवावेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवावेत
पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवावेत

पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवावेत

sakal_logo
By

पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवावेत
जयसिंगपूर ः जागतिक महिलादिनी येथील शानदार स्पोर्टस् ॲण्ड एज्युकेशन असोसिएशनतर्फे प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना ‘मलेका प्रेरणा पुरस्कार’ने सन्मानित केले जाणार आहे. शानदार स्पोर्टस् अँड एज्युकेशन असोसिएशनतर्फे पुरस्कारासाठी पात्र महिलांनी मलेका कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटकडे प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन मलेका कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या संचालिका डॉ. शकिला पटेल यांनी केले आहे. शैक्षणिक, सामाजिक, कला, क्रीडा व औद्योगिक अशा क्षेत्रापैकी कोणत्याही क्षेत्रातील कामाची ओळख विस्तृत माहिती लिखित स्वरूपात फोटोसह बायोडाटा अध्यक्ष, शानदार स्पोर्टस् अँड एज्युकेशन असोसिएशन यांच्या नावे मलेका कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट गल्ली क्रमांक १८ येथे ६ मार्चपर्यंत पाठावावेत, असे आवाहन केले आहे.